TRENDING:

साक्षात लक्ष्मीचे रूप! 'या' ठिकाणी तीळ असणाऱ्या स्त्रिया, सासरसाठी ठरतात अतिशय भाग्यवान

Last Updated:

सामुद्रिक शास्त्रामध्ये मानवी शरीराची रचना, खुणा आणि तीळ यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तीळ केवळ सौंदर्याची खूण नसून ते व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि भाग्याचे संकेत देतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Moles On Body : सामुद्रिक शास्त्रामध्ये मानवी शरीराची रचना, खुणा आणि तीळ यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तीळ केवळ सौंदर्याची खूण नसून ते व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि भाग्याचे संकेत देतात. ज्योतिषशास्त्रानुसार, काही स्त्रियांच्या अंगावर असे काही खास तीळ असतात, जे त्यांना 'भाग्यवान' आणि 'साक्षात लक्ष्मीचे रूप' बनवतात. असे मानले जाते की, ज्या स्त्रियांच्या अंगावर ठराविक ठिकाणी तीळ असतात, त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्या लग्नानंतर सासरच्या घरासाठीही भाग्योदय घेऊन येतात.
News18
News18
advertisement

कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असतो, ती अतिशय भाग्यवान असते. अशा स्त्रिया बुद्धीने चतुर आणि कष्टाळू असतात. लग्नानंतर त्या आपल्या पतीच्या आणि सासरच्या संपत्तीत वृद्धी करतात. त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य कायम राहते.

नाकाच्या उजव्या बाजूला तीळ

नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणाऱ्या स्त्रिया प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या असतात. आचार्यांच्या मते, अशा स्त्रियांना आयुष्यात कमी कष्टात अधिक यश मिळते. या स्त्रिया सासर आणि माहेर दोन्ही घरांसाठी 'लक्ष्मी' मानल्या जातात. त्यांना भौतिक सुखांची कमतरता कधीही भासत नाही.

advertisement

हनुवटीच्या मध्यभागी तीळ

हनुवटीवर तीळ असणे हे सौंदर्यासोबतच भाग्याचे लक्षण आहे. ज्या स्त्रियांच्या हनुवटीवर तीळ असतो, त्या स्वभावाने शांत आणि संयमी असतात. त्यांच्याकडे पैशांची आवक नेहमी सुरू असते आणि त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची ताकद ठेवतात.

डाव्या कंबरेवर तीळ

ज्या स्त्रियांच्या डाव्या कंबरेवर तीळ असतो, त्या अत्यंत श्रीमंत आणि विलासी जीवन जगणाऱ्या असतात. अशा स्त्रियांकडे अफाट संपत्ती असतेच, पण त्या दिसायलाही खूप आकर्षक असतात. त्यांचे व्यक्तिमत्व लोकांना लवकर प्रभावित करते.

advertisement

डाव्या तळहातावर तीळ

सामुद्रिक शास्त्रानुसार, पुरुषांच्या उजव्या तर स्त्रियांच्या डाव्या तळहातावर तीळ असणे शुभ मानले जाते. जर मुठ मिटल्यावर हा तीळ मुठीच्या आत येत असेल, तर ती स्त्री खूप धनवान बनते. अशा स्त्रियांच्या हातात पैसा टिकतो आणि त्या बचतीतही हुशार असतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
साक्षात लक्ष्मीचे रूप! 'या' ठिकाणी तीळ असणाऱ्या स्त्रिया, सासरसाठी ठरतात अतिशय भाग्यवान
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल