A नावाच्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे असते?
दिल्लीच्या ज्योतिषी ममता यांच्या मते, ज्या लोकांचे नाव 'अ' अक्षराने सुरू होते ते खूप बुद्धिमान, तेजस्वी, प्रामाणिक, प्रेमळ, दयाळू आणि प्रभावशाली असतात. अशा लोकांमध्ये अहंकाराची शक्ती असते. या लोकांना सर्जनशील कामात रस असतो आणि ते कोणत्याही कामाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास तयार असतात. हे लोक कष्टकरी असतात आणि म्हणूनच ते अधिक महत्त्वाकांक्षीही असतात.
advertisement
नोकरी-व्यवसाय -
‘अ’ अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक सरकारी नोकरीच्या क्षेत्रात जास्त दिसतात. हे लोक तज्ञ म्हणून काम करतात. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करण्याच्या गुणवत्तेमुळे हे लोक अशा क्षेत्रात दिसतात. उदाहरणार्थ, ते वकील, शास्त्रज्ञ आणि व्यापारी बनतात.
मंगळ-शुक्र एकत्र आल्यानं धनशक्ती राजयोग! भाग्यवान ठरणार या 5 राशीचे लोक
प्रेमजीवन -
'अ' अक्षरानं नाव सुरू होणारे लोक त्यांच्या आयुष्याचे उत्तम नियोजना करतात. त्यांना त्यांचा जोडीदार स्वतःला निवडायचा असतो. जर त्यांना त्यांच्या उर्जेशी जुळणारे कोणी सापडले तरच ते लगेच नातेसंबंध जोडतात. हे लोक नेहमी खरं प्रेम शोधतात. त्यांना नात्यात खोटेपणा अजिबात आवडत नाही.
A ने नाव सुरु होणाऱ्या लोकांमध्ये सर्वात वाईट गोष्ट कोणती?
A अध्याक्षराचे लोक कधीकधी फक्त स्वतःची काळजी घेऊ लागतात. त्यांना इतरांचे ऐकणे आवडत नाही. याशिवाय आपणच बरोबर आहे, असा त्यांचा हट्ट असतो. बऱ्याचदा त्यांचा अतिआत्मविश्वास अहंकारात बदलतो.
हे काम अवश्य करावे -
ज्योतिषी ममता सांगतात की, A अक्षरानं नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांनी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांची पूजा करावी. याशिवाय आदित्यहृदय स्रोताचा पाठही करावा.
झोपाळ्याचं वास्तुशास्त्र! घरात झोपाळा या दिशेला असणं शुभ, झुलण्यापूर्वी पहा नियम
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)