धाराशिव : आपल्या देशात विविध देवस्थानं अगदी दिमाखात उभी आहेत. मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतंच, परंतु मंदिरांच्या वास्तूही एवढ्या सुरेख आहेत की त्या पाहतच राहावं असं वाटतं. धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वरचं प्राचीन शिवमंदिरही यापैकीच एक. सुंदर कलाकृतींनी परिपूर्ण असलेलं हे मंदिर वास्तूकलेचं एक उत्तम उदाहरण आहे.
माणकेश्वर गावापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर विश्वरूपा नदीकाठी हे ऐतिहासिक शिवमंदिर वसलंय. चालुक्य काळातील हे मंदिर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या अंतर्भागात अत्यंत सुरेख असं कोरीव नक्षीकाम आहे. इथं देवी देवतांची शिल्प कोरण्यात आली आहेत. मंदिराला यादव राजा सिंघनदेव यांनी दान दिल्याचा शिलालेख मंदिरात कोरण्यात आला आहे. यावरूनच लक्षात येतं की, हे मंदिर किती प्राचीन आहे.
advertisement
हेही वाचा : बाप्पाची अशी मूर्ती राज्यात कुठंच पाहिली नसेल! साताऱ्यात वसलंय प्रसिद्ध मंदिर
या मंदिराच्या बाह्य भागावर एका कोपऱ्यात एक शिल्प कोरण्यात आलंय. हे शिल्प कोपरची आई म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याची मनोभावे पूजा केली जाते. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आलं की, हे शिल्प कोपराच्या आईचं नसून पत्रलेखिकेचं (एक असं शिल्प ज्यात सुंदर स्त्री पत्र लिहित आहे.) आहे. मात्र तरी आजही हे शिल्प कोपरची आई म्हणूनच पूजलं जातं. त्यामुळे ते पत्रलेखिकेचं असल्याची जनजागृती ग्रामस्थ गणेश अंधारे हे करतात.
दरम्यान, या मंदिरावर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. जवळपास 4 फूट उंच जोत्यावर या मंदिराचं बांधकाम आहे. काळानुरूप आक्रमणकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड झाल्याचं दिसून येतं.