फेब्रुवारी 2024 चे पहिले प्रदोष व्रत कधी?
वैदिक कॅलेंडरच्या आधारे पाहिले तर, या वर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी बुधवार, 07 फेब्रुवारी रोजी दुपारी 02:02 वाजता सुरू होईल. ही तिथी गुरुवार, 08 फेब्रुवारी रोजी रात्री 11:17 वाजता संपणार आहे. अशा स्थितीत प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळेवर आधारित फेब्रुवारीचे पहिले प्रदोष व्रत बुधवार, 07 फेब्रुवारी रोजी पाळण्यात येणार आहे.
advertisement
फेब्रुवारी प्रदोष व्रत 2024 मुहूर्त
07 फेब्रुवारी रोजी प्रथम प्रदोष व्रताची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:05 ते रात्री 08:41 पर्यंत आहे. त्या दिवशी शिवपूजेसाठी तुम्हाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल. या व्रतामध्ये प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करणे आवश्यक आहे.
फेब्रुवारीमध्ये 4 मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन! या 6 राशींचे भाग्य उजळणार
वज्र योग आणि पूर्वाषाढा नक्षत्रात प्रदोष व्रत -
फेब्रुवारीचं पहिलं प्रदोष व्रत वज्र योग आणि पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी वज्र योग दिवसभर राहील. 08 फेब्रुवारी रोजी पहाटे 02:53 पासून सिद्धी योग सुरू होईल. पूर्वाषाढा नक्षत्रही प्रदोषाच्या दिवशी संपूर्ण काळ राहील. 08 फेब्रुवारीला पहाटे 04:37 पर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र आहे. त्या दिवशीचा ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:22 ते 06:14 पर्यंत आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक -
शिववासही 7 फेब्रुवारीला आहे. त्या दिवशी उपवास करण्यासोबतच रुद्राभिषेकही करू शकता. प्रदोष व्रताच्या दिवशी नंदीवर शिववास पहाटेपासून दुपारी 02:02 पर्यंत आहे.
प्रदोष व्रताचे महत्त्व -
प्रदोष व्रतामध्ये महादेवाची पूजा केल्यानं मनुष्याचे दुःख, पाप, रोग आणि दोष दूर होतात. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेनं संतती, सुख, समृद्धी, यश, धन, धान्य इ. भरपूर मिळतं, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)