यावेळी महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला. पूजेसाठी दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण आणि सोबत ब्रह्मवृदांचा विधिवत अखंड मंत्रोच्चार सुरू झाला. साथीला वारकऱ्यांचा माऊली नामाचा अखंड जयघोष सुरु होता. गुरु हैबतबाबांच्या पायरीचे विधिवत पूजन झाल्यानंतर माऊलींची आरती आणि पसायदान म्हणण्यात आले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. परंतु हे हैबत बाबा नेमके कोण आणि त्यांच्या पायरीपूजनाने का होते संजीवन सोहळ्याला सुरुवात हे आपण जाणून घेऊया.
advertisement
खंडोबाचा नवरात्री उत्सव कसा असतो? का साजरी करतात चंपाषष्ठी? Video
कोण होते हैबतबाबा?
हैबतबाबा पवार उर्फ हैबतबाबा आरफळकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे. पण ते ग्वाल्हेर येथील शिंदे सरकार यांच्या सैन्यातील सरदार होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा होती. एकदा काय झालं तर त्यांची वारी ग्वाल्हेरहून आळंदीकडे येत असताना सातपुडा पर्वत भागात काही दरोडेखोरांनी त्यांना घेरलं. त्यावेळी त्या दरोडेखोरांनी हैबत बाबांच्या अनेक साथीदारांना ठार देखील केलं. मग त्यावेळी संकटात सापडलेल्या हैबतबाबांनी म्हणे ज्ञानेश्वर माऊलींचा धावा सुरु केला. त्यानंतर दरोडेखोरांच्या हातून सुटका झालेल्या हैबतबाबांना हा आपला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटू लागल. आपण फक्त माऊलीं मुळे वाचलो अशी त्याची धारणा झाली.
तुळशीसंबंधी ‘हे’ करून पहा, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
त्यामुळे आता उरलेलं आयुष्य हे फक्त आणि फक्त माऊलीच्याच सेवेत घालवायचे या विचारातून एका धारकऱ्याचा वारकरी झाला. आणि पुढे आळंदी मध्येच ते स्थायिक झाले. जसं संतांनी आपलं जीवन पांडुरंगाच्या चरणावर वाहिलेलं होतं नेमकं तसंच हैबतीबाबांनी देखील आपलं संपूर्ण जीवन ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणांवर अर्पण केलेलं होतं. त्यामुळंच पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणाजवळ जसं नामदेव पायरीचं महत्वय अगदी तसंच ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ हैबतबाबांच्या पायरीचं स्थान अबाधित आहे. त्यामुळे माऊलींच्या संजीवन सोहळ्याची सुरुवात हैबतबाबांच्या पायरी पूजनाने होते, अशी आख्यायिका मंदिराचे विश्वस्त योगी निरंजन महाराज यांनी सांगितली.





