तुळशीसंबंधी ‘हे’ करून पहा, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
ज्या घरात तुळशीचं वास्तव्य असतं, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी नांदत असते त्यामुळे हिंदू धर्मात या रोपाची रोज पूजा केली जाते
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप शुभ मानलं जातं. तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. धर्म, ज्योतिष या शिवाय वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ज्या घरात तुळशीचं वास्तव्य असतं, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी नांदत असते त्यामुळे हिंदू धर्मात या रोपाची रोज पूजा केली जाते.
यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही, करिअरमधील अडथळे दूर होतात, घरात नेहमी शांतता राहते आणि संकटांचा नाश होतो. मात्र, तुळशीशी संबंधित उपाय पद्धतशीर केले तरच या समस्या टाळता येतात.
1.तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्या घरात तुळस आहे त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास भगवान विष्णू तसंच माता लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं.
advertisement
2.खरं तर तुळशीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि हे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसारही घरात तुळशीचं रोप ठेवल्याने सुखसमृद्धी नांदते आणि आर्थिक संकटांपासून दूर राहता येतं. तुळशीचं रोप पर्यावरण शुद्ध करण्यासाठी, सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी लावलं जातं.
3. असं म्हटलं जातं की तुळशीच्या रोपाला नियमित जल अर्पण केल्याने तुळशीचं रोप समृद्ध राहतं आणि त्यामुळेच आपल्या घरातही सुखसमृद्धी नांदते. जीवन सुखी होण्यासाठी घरामध्ये तुळशी पूजन अवश्य करावं.
advertisement
4. चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा प्रयोग केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल.
5. तुळशीला जल - जितकं शुभ तुळशीचे रोप असतं त्यापेक्षा जास्त शुभ आणि शुद्ध तुळशीचं जल असतं.
advertisement
6. उपाय - तुळशीची पानं रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडल्यास घरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
7. तुळशीची पानं पाण्यात भिजवून त्याने भगवान श्रीकृष्णाला स्नान घालणं खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपादृष्टी आपल्यावर टिकून राहते असं म्हटलं जातं.
advertisement
8. तुळशीचं पाणी नेहमी तांब्याच्या भांड्यात ठेवावं आणि ते नेहमी तुमच्या देवघरात ठेवा. असं केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते.
9. सकळी तुळशीला जल अर्पण करताना 11 किंवा 21 वेळा ॐ- ॐ चा जप करावा असं केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2023 8:04 PM IST


