TRENDING:

'या' 3 राशींचीच महाशिवरात्री! महादेवांचा आशीर्वाद मिळणार, 300 वर्षांनी आला योग

Last Updated:

यंदाच्या महाशिवरात्रीला तर अनेक दुर्मीळ योग तयार होत आहेत. या दिवशी ग्रह ज्या स्थितीत असतील ती ग्रहस्थिती तब्बल 300 वर्षांनी असणार आहे. त्यातून काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य पार उजळून निघणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुर्गेश सिंग राजपूत, प्रतिनिधी
आपल्यावर महादेवांची विशेष कृपा असेल.
आपल्यावर महादेवांची विशेष कृपा असेल.
advertisement

नर्मदापुरम : यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी एक दुर्मिळ योग तयार होतोय, जो काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्या राशींच्या व्यक्तींना महादेवांचा विशेष आशीर्वाद मिळेल. ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ज्योतिषांनी सांगितलं की, या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा केल्यास आपण हाती घेऊ ती कामं सुरळीत पार पडतात. यंदाच्या महाशिवरात्रीला तर अनेक दुर्मीळ योग तयार होणार आहेत. या दिवशी ग्रह ज्या स्थितीत असतील ती ग्रहस्थिती तब्बल 300 वर्षांनी निर्माण होणार आहे. त्यातून काही राशींच्या व्यक्तींचं आयुष्य पार उजळून निघेल.

advertisement

शनीदेवांचा मिळेल आशीर्वाद, काळ्या कुत्र्याचा करा उपाय; अख्खं आयुष्य पालटेल!

महाशिवरात्रीला आहेत कोणते योग?

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी मकर राशीत मंगळ आणि चंद्राची युती होणार आहे, त्यातून चंद्र मंगळ योग तयार होईल. तर, कुंभ राशीत शुक्र, शनी आणि सूर्य ग्रहाच्या संयोगामुळे त्रिग्रही योग निर्माण होईल. मीन राशीत राहू आणि बुध ग्रहाची युती असेल. तसंच महाशिवरात्रीच्या पहाटे 04:45 वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर शिवयोग असेल. त्याचवेळी सकाळी 6.45 वाजल्यापासून सर्वार्थ सिद्धी योग सुरू होतोय. हा योग सकाळी 10:41 वाजेपर्यंत असणार आहे. प्रदीर्घ काळानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी असे अनेक योगायोग घडत असल्याचं मानलं जातंय. ग्रहांची अशी स्थिती सुमारे 300 वर्षांनंतर असणार आहे.

advertisement

महाशिवरात्री 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास! फक्त 7 दिवसात अडचणी होतील दूर, पण...

कोणाला मिळणार सुख?

मेष: महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना महादेवांचा भरपूर आशीर्वाद मिळेल. त्यांना आर्थिक लाभ होईल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. करियरमध्ये प्रगती आणि बढतीची प्रचंड शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. मेहनतीचं फळ मिळेल. नेतृत्त्व क्षमता वाढेल. करिअरमधले सर्व अडथळे दूर होतील. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात अनेक सुवर्णसंधी मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. भूतकाळातील गुंतवणुकीचा नफा आता मिळण्याची शक्यता आहे. त्याचा आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येईल.

advertisement

मिथुन: या राशीच्या व्यक्तींवरही महादेवांची विशेष कृपा असेल. व्यावसायिक जीवनात प्रगतीची शक्यता आहे. हे लोक स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तसंच व्यवसायात एक नवा करार होण्याची शक्यता आहे, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. नात्यातही बरेच सकारात्मक परिणाम दिसतील. महादेवांच्या कृपेने प्रदीर्घ काळापासून थांबलेली कामं आता मार्गी लागतील. त्यातही यश मिळेल.

advertisement

सिंह: या राशीच्या व्यक्तींनाही भरपूर फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून फायदा मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल, कर्जमुक्ती मिळेल आणि बँक बॅलन्सही वाढेल. नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध सुधारतील. भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाने अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधही चांगले राहतील.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या/अध्यात्म/
'या' 3 राशींचीच महाशिवरात्री! महादेवांचा आशीर्वाद मिळणार, 300 वर्षांनी आला योग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल