शनीदेवांचा मिळेल आशीर्वाद, काळ्या कुत्र्याचा करा उपाय; अख्खं आयुष्य पालटेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्या व्यक्तीला शनीदेव प्रसन्न तिचं आयुष्य सुखाचं, हे समीकरण फार जुनं आहे. तर, याउलट जर एखाद्या व्यक्तीवर शनीची वाईट कृपा असेल तर तिच्यामागे एवढ्या अडचणी लागतात की, त्यातून डोकं वर काढणंही अवघड होतं.
शुभम मर्मत, प्रतिनिधी
उज्जैन : ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता म्हटलं जातं. शनीदेवच व्यक्तीला तिच्या चांगल्या-वाईट कर्मांचं फळ देत असतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला शनीदेव प्रसन्न तिचं आयुष्य सुखाचं, हे समीकरण फार जुनं आहे. तर, याउलट जर एखाद्या व्यक्तीवर शनीची वाईट कृपा असेल तर तिच्यामागे एवढ्या अडचणी लागतात की, त्यातून डोकं वर काढणंही अवघड होतं. परंतु घाबरू नका, तुम्हाला शनीदोषांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आज आपण त्यासाठी काही सोपे उपाय पाहूया.
advertisement
शनीदोषांपासून मुक्ती मिळणं म्हणजेच तुम्हाला शनीदेव प्रसन्न असणं. एकदा शनीदेवांचा आशीर्वाद मिळाला की, तुमचं आयुष्य आनंदाने न्हाऊन निघतं, तुम्हाला कसलीच कमी भासत नाही. मात्र त्यासाठी काही उपाय करणं आवश्यक आहे. याबाबत उज्जैनचे ज्योतिषी आनंद भारद्वाज काय सांगतात, पाहूया.
advertisement
कुत्र्याला कधीच मारू नका!
एखाद्या व्यक्तीवर हात उचलणं चुकीचं आहे. शिवाय आपण जसा माणसांना जीव लावतो तसाच प्राण्यांना जीव लावणंही गरजेचं आहे. विशेषत: कुत्र्याला कधीच दुखवू नका. त्याला मारण्याचा तर विचारही करू नका. कुत्र्याची सेवा केल्यास शनीदेव प्रसन्न होतात. तर, कुत्र्याला त्रास दिल्यास शनीदेव आपल्यावर रागवू शकतात.
advertisement
कुत्र्यावर प्रेम करा!
तुम्ही कुत्र्याची शक्य तितकी सेवा करा. घरीसुद्धा कुत्रा पाळू शकता. जर घरी पाळणं शक्य नसेल तर बाहेरच्या कुत्र्यांवर माया करा, त्यांना खायला द्या, पाणी द्या. कारण आपण भूक लागल्यावर वाटेल ते खाऊ शकतो. तहान लागल्यावर स्वत: पाणी पिऊ शकतो. तसं प्राण्यांना त्यांच्या गरजा बोलून दाखवता येत नाहीत. शिवाय त्यांना अन्न, पाणी मिळणं सहज शक्य नसतं.
advertisement
शनीला प्रसन्न करण्याचे उपाय
दर शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला दूध आणि भाकरी खाऊ घाला. असं केल्यास शनीची महादशा आणि साडेसातीचा प्रभाव कमी होईल. इतकंच नाही, तर शनीच्या प्रकोपामुळे बिघडणारी तुमची कामंही सुरळीत होतील. विशेष म्हणजे तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन आयुष्यात आर्थिक स्थैर्य येईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
March 05, 2024 5:54 PM IST


