राहू आणि शुक्र 18 वर्षांनी येणार एकत्र; गुरूच्या राशीत होणार युती! तुमची रास कोणती?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जेव्हा दोन ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रहांची युती म्हणतात. आता राहू आणि शुक्राची युती कोणासाठी काय घेऊन येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : ज्यांच्या कुंडलीत राहू सुस्थितीत त्यांची भरभराट, ज्यांच्या कुंडलीत राहू कमकुवत त्यांच्या अवतीभोवती अडचणीच अडचणी, हे गणित अगदी ठरलेलं आहे. आता हाच राहू ग्रह ज्या मीन राशीत आहे. तिथे लवकरच शुक्र ग्रहाचा प्रवेश होणार आहे. मीन ही गुरू ग्रहाची रास आहे.
जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. तर, जेव्हा दोन ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रहांची युती म्हणतात. आता राहू आणि शुक्राची युती कोणासाठी काय घेऊन येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहू आणि शुक्राच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे. त्यांच्यावर जणू पैशांचा वर्षाव होईल. वैभव आणि धनसंपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह 31 मार्चला मीन राशीत प्रवेश करेल. जिथे आधीपासून राहू विराजमान आहे. म्हणजेच मीन राशीत हे दोन्ही ग्रह एकत्र येतील. जवळपास 18 वर्षांनी या ग्रहांची युती होणार आहे. अर्थातच त्यातून काही राशींच्या व्यक्तींचा बक्कळ फायदा होईल.
advertisement
कर्क : आपल्यासाठी राहू आणि शुक्राची युती लाभदायी ठरेल. आपल्याला भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. कामानिमित्त प्रवास होईल, हा प्रवास फायदेशीर ठरेल. थांबलेली सर्व कामं पूर्ण होतील. करियर आणि व्यवसायात यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.
advertisement
कन्या : प्रेमात असाल तर या ग्रह युतीमुळे आपलं नातं आणखी घट्ट होणार आहे. विवाहित असाल तर खूप सुख अनुभवायला मिळणार आहे. एकूणच आपली लव्ह लाईफ उत्तम होईल. अविवाहित असाल, तर विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. शिवाय याच काळात आपल्याला आर्थिक लाभ होण्याचा योग आहे.
कुंभ : या ग्रह युतीमुळे आपल्याला अचानक धनलाभ होईल. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्यात यश मिळेल. नवे संपर्क तयार होतील. उत्पन्न वाढेल. आपण आखलेल्या सर्व योजना पूर्ण होतील. ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व आधीपेक्षा आता आणखी भक्कम होईल. आपला बँक बॅलन्स वाढेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Madhya Pradesh
First Published :
March 04, 2024 6:06 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
राहू आणि शुक्र 18 वर्षांनी येणार एकत्र; गुरूच्या राशीत होणार युती! तुमची रास कोणती?


