TRENDING:

जप करताना माळ कशी धरावी? शुभ फळ प्राप्तीसाठी हे नियम माहिती हवेच, Video

Last Updated:

हिंदू धर्मात अनेकजण जपमाळेने जप करत असतात. पण ही माळ जपताना त्याबाबत नियम माहिती असणे गरजेचे असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी
advertisement

वर्धा: दैनंदिन जीवनात देवाची पूजा करत असताना हिंदू धर्मात माळ देखील जपली जाते. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी माळ जप केला जातो. मात्र, शुभ फळ प्राप्तीसाठी हा जपमाळांचा जप करताना काही नियम पाळावे लागतात. याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.

advertisement

मसाल्यांमुळे उजळेल भाग्य, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय माहितीयेत का? Video

जपमाळ जपाचे नियम

भगवंताचे स्मरण करताना जपमाळ जपताना स्वच्छ मुद्रा वापरावी. उपासनेसाठी बसताना आसन न करता जमिनीवर बसून जप केल्यास फळ नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे जप करताना आसणावरच बसावे. आसन स्वच्छ असावे. याशिवाय जप करताना व्यक्तीचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे. जपमाळ जपत असताना माळ नेहमी हृदयचक्राजवळ असावी. तसेच जप करण्यासाठी मधल्या बोटाचा वापर करावा. मणी बदलण्यासाठी अंगठा वापरावा. तसेच मणी बदलताना तो स्वत:कडे वळवावा, असे पाचखेडचे महाराज सांगतात.

advertisement

करिअरच्या बाबतीत यशस्वी होण्याची शक्यता; मेष राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

ब्रम्हमुहूर्तावर जप केला तर उत्तम

"नामजप करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. यासोबतच शांत वातावरणात आणि शुद्ध ठिकाणी बसून माळ जप करावा. ब्रह्म मुहूर्तावर जर एखाद्या व्यक्तीने जप केला तर ते अधिक फलदायी होईल हे लक्षात ठेवा. जपमाळाने जप करताना काही चुका अजिबात करू नका. यामध्ये गळ्यात जपमाळ घालू नका. पूजा केल्यानंतर मंदिरात आदराने ठेवा. दुसऱ्याच्या जपमाळाने कधीही मंत्राचा जप करू नका. मंत्राचा उच्चार करताना कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार मनात आणू नका, असे केल्याने मंत्राचे परिणाम नष्ट होऊ शकतात, असे हेमंतशास्त्री सांगतात.

advertisement

आपण देखील रोज जपमाळ जपत असाल तर या नियमांबाबत अवगत असावे. तसेच फलप्राप्तीसाठी ते आचरणात आणावेत," असेही हेमंतशास्त्री सांगतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
जप करताना माळ कशी धरावी? शुभ फळ प्राप्तीसाठी हे नियम माहिती हवेच, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल