TRENDING:

Shravan Somwar: श्रावणातला तिसरा सोमवार, महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? संपूर्ण माहिती

Last Updated:

Shravan Somwar 2025: श्रावणातल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ अर्पण केली जाते. दर सोमवारी वेगळी शिवामूठ महादेवाला वाहिली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: श्रावण महिना हा देवदेवांचा महिना म्हणून प्राचीन काळापासून ओळखला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवशंकराच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. पारंपरिक श्रद्धेनुसार श्रावणातील चारही सोमवारी विशिष्ट शिवामूठ अर्पण करतो. पहिल्या सोमवारी तांदळाचे, दुसऱ्या सोमवारी तिळाचे आणि तिसऱ्या सोमवारी मुगाचे शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे. 11 ऑगस्ट 2025 रोजी श्रावणातील तिसरा सोमवार आहे. या सोमवारची शिवामूठ मूग असून याचे महत्त्व आदित्य जोशी गुरुजी यांनी सांगितलं आहे.
advertisement

मूग अर्पणाची धार्मिक पार्श्वभूमी

पुराणकथांनुसार भगवान शंकर हे ‘हरितप्रिय’ आहेत, म्हणजेच हिरव्या रंगाच्या वस्तू त्यांना विशेष प्रिय आहेत. त्यामुळे बिल्वपत्र, मूग यांसारख्या हिरव्या वस्तूंचे अर्पण महत्त्वाचे मानले जाते. मूग अर्पण केल्याने कर्जमुक्ती मिळते, घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि आरोग्य, समाधान व समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे.

अंबाबाई भक्तांपासून दुरावणार! इतके दिवस मूळ मूर्तीचं दर्शन बंद

advertisement

कृषीशी जोडलेला संबंध

श्रावण हा काळ कडधान्यांच्या पिकांच्या परिपक्वतेचा असतो. याच वेळी शेतांमध्ये मुगाची झाडे हिरवीगार दिसतात. पूर्वीच्या कृषिप्रधान समाजात, नवीन हंगामातील पीक सर्वप्रथम देवाला अर्पण करण्याची परंपरा होती. यामागे पीकसमृद्धीची प्रार्थना आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हेतू होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

मूग अर्पणाच्या प्रथेमध्ये केवळ धार्मिकता नाही तर पोषणमूल्यांचाही संदेश आहे. मूग हे प्रथिनयुक्त, पचायला सोपे आणि आरोग्यदायी अन्न आहे. म्हणूनच, अर्पणानंतर मुगाचे प्रसादरूप सेवन आरोग्य वृद्धिंगत करण्यास मदत करते.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan Somwar: श्रावणातला तिसरा सोमवार, महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल