Kolhapur Temple: अंबाबाई भक्तांपासून दुरावणार! इतके दिवस मूळ मूर्तीचं दर्शन बंद
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Kolhapur Temple: अंबाबाईची मूळ मूर्ती कित्येक शतकांपासून लाखो भाविकांच्या श्रद्धास्थानी आहे. त्यामुळे तिचं संवर्धन आणि जतन अतिशय गरजेचं आहे.
कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई ही अनेकांची कुलदेवता आहे. या ठिकाणी राज्यासह विविध ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अंबाबाईच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी भक्तांना देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन करता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीने संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या (एएसआय) सर्वेक्षणानुसार ही प्रक्रिया, येत्या 11 आणि 12 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. या संवर्धन प्रक्रियेच्या काळात मूळ मूर्तीचा गाभारा भाविकांसाठी बंद राहील. मात्र, अंबाबाईची उत्सव मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित केली जाणार आहे. भाविकांना नेहमीप्रमाणे या मूर्तीचं दर्शन घेता येईल. मंदिर प्रशासनाने याबाबत नियोजन केलं आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही.
advertisement
कोर्टाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली आहे. देवीचे नाक, ओठ, हनुवटी याला तडे गेले आहेत. त्यामुळे देवीचा चेहरा व किरीट या भागांचे तातडीने संवर्धन गरजेचं आहे. भारतीय पुरातत्व विभागाने अलीकडेच देवीच्या मूळ मूर्तीचं सर्वेक्षण केलं होतं. मूर्तीवर होणारा हवामान, प्रदूषण आणि इतर घटकांचा परिणाम कमी करण्यासाठी यासाठी तातडीने संवर्धन प्रक्रिया करण्याची गरज असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवसांत मूर्तीवर विशेष तज्ज्ञांकडून रासायनिक व संरक्षक प्रक्रिया केली जाणार आहे.
advertisement
मूर्तीच्या संवर्धनासाठी फक्त तज्ज्ञांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रक्रियेत पारंपरिक पद्धत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मूर्तीवर एक संरक्षक थर तयार होईल. त्यामुळे तिचं दीर्घायुष्य वाढेल आणि भविष्यातील हानी टाळता येईल. अंबाबाईची मूळ मूर्ती कित्येक शतकांपासून लाखो भाविकांच्या श्रद्धास्थानी आहे. त्यामुळे तिचं संवर्धन आणि जतन अतिशय गरजेचं आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 10, 2025 8:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur Temple: अंबाबाई भक्तांपासून दुरावणार! इतके दिवस मूळ मूर्तीचं दर्शन बंद


