देवघर : सूर्य मकर राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. तिथे राहू आधीपासूनच ठाण मांडून बसलाय. त्यामुळे आता याच महिन्यात सूर्य आणि राहू ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे आता काही राशीच्या व्यक्तींनी सावध राहणं आवश्यक आहे. त्यांच्यावर या युतीची वाईट दृष्टी पडणार आहे. झारखंडमधील देवघरच्या ज्योतिषांनी कोणत्या राशींच्या व्यक्तींना सावधगिरीचा इशारा दिला आहे, पाहूया.
advertisement
(पहिलं चंद्रग्रहण! दिसणार नाही, पण जाणवेल, 'या' 3 राशींच्या व्यक्तींनी जरा जपून)
ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, तब्बल 25 वर्षांनी सूर्य आणि राहूची युती होणार आहे. 14 तारखेला मीन राशीत सूर्याचा प्रवेश होईल. त्यामुळे 14 मार्चला सूर्य आणि राहूची मीन राशीत युती होईल. जेव्हा या दोन ग्रहांची युती होते तेव्हा ग्रहण योग निर्माण होतो जो अत्यंत खतरनाक असतो. यावेळी त्यापासून खालील राशींना धोका असेल.
(Ram Mandir: श्रीरामांच्या दर्शनाला चक्क आले पक्षी, पाहून भाविक गहिवरले)
सिंह : आपल्यावर सूर्य आणि राहूची वाईट दृष्टी पडणार आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान आरोग्याचं होईल. रुग्णालयाच्या वाऱ्या पाठी लागतील. त्यामुळे काळजी घ्या. शिवाय खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती असेल. म्हणून या काळात गुंतवणूक करू नका. त्यातून नुकसान होईल.
तूळ : आपल्यावर या युतीचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. जोडीदारासोबत लहान लहान गोष्टींवरून खटके उडतील. सर्व बाजूंनी अडचणीत याल. शत्रू आपल्यावर भारी पडतील. एखादा जुना आजार आता डोकं वर काढू शकतो. काळजी घ्या. कोणालाही पैसे उधार देणं टाळा.
कुंभ : आपल्यावर सूर्य आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यामुळे वाद-विवादात पडू नका. वातावरण बदलताच आजारी पडाल, काळजी घ्या. वाहन चालवताना जरा जपून, नाहीतर अपघात होऊ शकतो. घरात भांडण होऊ शकतं. त्यामुळे आपल्याकडून भांडणाची सुरुवात होणार नाही ना, याकडे लक्ष द्या.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
