Ram Mandir: श्रीरामांच्या दर्शनाला चक्क आले पक्षी, पाहून भाविक गहिवरले
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दृश्य अगदी अद्भुत मानलं जातंय. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह विविध पक्ष्यांमुळे आता श्रीरामांच्या मंदिराचं रूप आणखी सजलंय.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : 22 जानेवारीला श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात विराजमान झाले. घरोघरी त्यांची पूजा करून संपूर्ण देशातील नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. तेव्हापासून दररोज या मंदिरात जवळपास 2 ते 3 लाख भाविक श्रीरामांच्या दर्शनाला येतात. आता तर भाविकांसह चक्क पशू-पक्षीही रामलल्लांचं दर्शन घेऊ लागले आहेत. सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
advertisement
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये एक पक्षी श्रीरामांचं परिक्रमण करताना दिसतोय. हे दृश्य अगदी अद्भुत मानलं जातंय. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसह विविध पक्ष्यांमुळे आता श्रीरामांच्या मंदिराचं रूप आणखी सजलंय.
मागील काही दिवसांमध्ये एक वानरसुद्धा या मंदिरात पाहायला मिळालं. हे वानर म्हणजे खुद्द मारुतीरायांचं रूप असल्याचं मानलं जातंय. मारुतीराया स्वत: श्रीरामांच्या दर्शनाला आले, असं सुंदर दृश्य त्यावेळी भाविकांनी पाहिलं. तर, पक्षी कधी एका ठिकाणी बसून श्रीरामांचं रूप न्याहाळताना दिसलं, तर कधी पंख पसरून गाभाऱ्यात झेप घेताना दिसलं.
advertisement
दरम्यान, अयोध्येतील श्रीराम मंदिर हे ऐतिहासिक आणि भव्य मंदिर आहे. नागर शैलीतून बांधलेलं हे मंदिर अतिशय सुरेख दिसतं. त्याच्या प्रत्येक स्तंभावर कोरीवकाम केलेलं असून मंदिरात अनेक देवी-देवतांचं दर्शन घडतं.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view commentsLocation :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
February 29, 2024 10:08 PM IST


