गेल्या 19 वर्षापासून श्री प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश मंडळ नव नवीन कलाकृतीच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी देशभरातील प्रसिद्ध मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती बनवल्या जातात. 2024 मध्ये देखील या मंडळाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट देखवा म्हणून प्रथम पुरस्कार मिळवला होता. फायर अॅण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे सुरक्षित गणेश मंडळ म्हणून नाशिक जिल्ह्यातून पहिला पुरस्कार मिळाला होता.
advertisement
यंदा आकर्षक देखावा
यंदा देखील श्री प्रतिष्ठानने पर्यावणपुरक मथुरेतील प्रसिद्ध प्रेम मंदिर साकारले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर साकारताना पर्यावरणपुरक वस्तूंचा वापर केला आहे. ही आरास प्रेम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती आहे. तसेच मंदिरातील परिसरात श्री कृष्ण सृष्टी साकारली असून यात बाळ कृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या सर्व रासलीला यात दाखवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मथुरेतील प्रेम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती नाशिकमध्ये पाहायला मिळत असल्याने नाशिककर गर्दी करत आहेत.