देवघर : मार्च महिन्यात शनी आणि सूर्यासह काही मोठे ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. शिवाय या महिन्यात वर्षांतलं पहिलं चंद्रग्रहण लागणार आहे. जेव्हा देशभरात रंगपंचमी साजरी होईल, तेव्हाच म्हणजे 25 तारखेला चंद्रग्रहण लागणार आहे. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक काळही पाळला जाणार नाही. परंतु या ग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होईल. काही राशींसाठी तो सकारात्मक असेल, तर काही राशींसाठी नकारात्मक.
advertisement
ग्रहण काळात चंद्र कन्या राशीत असणार आहे, तिथे आधीपासूनच राहू विराजमान आहे. म्हणजेच कन्या राशीत ग्रहांची युती होईल. ही युती कोणत्या राशींसाठी लाभदायी ठरणार, पाहूया.
या सुखांनो या...March तरी देईल का पैसा? 'या' 4 राशींच्या व्यक्तींनी निश्चिंत राहा
काय सांगतात ज्योतिषी?
झारखंडच्या देवघर भागातील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, यंदा एकूण 5 ग्रहण असतील. 3 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण. त्यापैकी पहिलं ग्रहण आहे येत्या 25 मार्चला. या ग्रहणामुळे काही राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळेल. त्या राशी कोणत्या, पाहूया.
PHOTOS : 'ही' झाडं सांगतात तुमचं भविष्य, फक्त अचूक ओळखणं महत्त्वाचं!
मेष : आपला आत्मविश्वास वाढेल. आरोग्यही उत्तम साथ देईल. आर्थिक अडचणी दूर होतील.
मकर : आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. आई-वडिलांसोबत चांगला वेळ घालवाल.
कर्क : पालकांना आपल्या मुलांकडून शुभवार्ता कळतील. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. आई-वडिलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवाल.
कन्या : आपल्यावर पैशांचा वर्षाव होईल. एक उत्तम प्रवासही होऊ शकतो. हा प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरेल.
धनू : आपल्यासाठी जमीन खरेदीचा योग आहे. व्यवसायात आर्थिक नफा होईल. आई-वडिलांना मुलांकडून शुभवार्ता कळतील.
'या' राशीच्या व्यक्तींनी राहावं सावधान
मिथुन : आपल्यावर ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्यामुळे जपून राहा. आपल्यासोबत अपघात घडण्याची शक्यता आहे. वाद-विवादात अजिबात पडू नये. त्यातून मानसिक ताण येईल.
सिंह : व्यवसायात आर्थिक नफा होईल. घरात भांडण होईल. भरपूर कष्ट वाट्याला येतील. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : या ग्रहणामुळे आपल्यासोबत एखादी दुःखद घटना घडू शकते. कामं पूर्ण न झाल्याने आपली चिंता वाढेल. आपण खर्चात पडाल. जोडीदारासोबत खटके उडू शकतात. त्यामुळे ग्रहणाच्या दिवशी काळजी घ्या.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
