अयोध्या : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ठराविक कालावधीनंतर ग्रह आपली चाल आणि स्थिती बदलतात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. या राशीप्रवेशांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. त्यातून काही राशींना सुख मिळतं, तर काही राशींच्या वाट्याला दुःख येतं.
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्य ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. येत्या 14 मार्चला सूर्याचा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश होईल. या राशीप्रवेशामुळे काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे. त्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या, पाहूया.
advertisement
महाशिवरात्री नेमकी कधी आहे? 8 की 9...ज्योतिषांनी सांगितला शुभ मुहूर्त
मेष : आपल्याला हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल.
मिथुन : आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल. व्यवसाय विस्तारेल. नोकरीत बढती मिळेल.
धनू : आपलीही आर्थिक स्थिती भक्कम होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल, वैवाहिक जीवनात गोडवा येईल, परदेश प्रवास होऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.
मीन : आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. समाजात आपला मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.
कन्या : आपल्याला जोडीदाराचं चांगलं सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आपली खोळंबलेली सर्व कामं आता पूर्ण होतील. व्यवसाय विस्तारेल. समाजात आपला मान-सन्मान वाढेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
