नर्मदापुरम : आज फेब्रुवारी महिना संपून उद्या मार्च उजाडेल. काही राशींसाठी हा महिना अत्यंत सुखद असणार आहे. त्यांचं नशीब पार उजळून निघेल. कारण याच महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशीपरिवर्तन होणार आहे. ज्यांचा 4 राशींच्या व्यक्तींवर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल. या व्यक्ती धनसंपत्तीने मालामाल होतील. त्यांच्या सर्व आर्थिक अडचणी हळूहळू संपुष्टात येतील.
advertisement
ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर पैशांचा जणू वर्षावच वर्षाव होईल. सुख आता त्यांच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, पाहूया.
रात्रीची स्वप्न असतात भारी, त्यात दिसल्या 'या' गोष्टी की, पैशांची भासत नाही कमी!
'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनप्राप्ती
मेष राशीच्या व्यक्तींना या काळात एक जीवाभावाचा सखा मिळणार आहे. शिवाय बौद्धिक कार्यात यश मिळेल. नव्या नोकरीत रुजू होण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवास होईल. आईच्या आशीर्वादाने आपल्याला धनलाभ होईल.
ग्रहांचा राजकुमार उजळवेल नशीब, 3 राशींवर होईल पैशांचा वर्षाव!
मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी रुजू व्हावं लागू शकतं. आपल्याला आई-वडिलांसोबत चांगला वेळ घालवता येईल. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसाय विस्तारेल. भावंडांची साथ मिळेल. घरात शुभ कार्य पार पडेल.
सिंह राशीच्या व्यक्तींना आईचा जास्तीत जास्त सहवास मिळेल. नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आपला आत्मविश्वास वाढेल. घरात आनंदाचं वातावरण असेल. सारंकाही उत्तम होईल फक्त मेहनतीला पर्याय नाही हे विसरू नका.
कन्या राशीच्या व्यक्तींना धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपण कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. आपला आत्मविश्वास वाढेल. नोकरी बदलण्याचा योग आहे. भावंडांकडून चांगलं सहकार्य मिळेल. परंतु आळस करू नका. प्रत्येक कार्यात मेहनत आवश्यक आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
