रात्रीची स्वप्न असतात भारी, त्यात दिसल्या 'या' गोष्टी की, पैशांची भासत नाही कमी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
स्वप्नशास्त्रात असं सांगितलंय की, स्वप्नात घाण दिसणं म्हणजे नशिबाचं दार उघडलंच म्हणून समजायचं. आता आपल्याकडे कुठूनही पैसे येऊ शकतात. त्यामुळे आता आपण निश्चिंत राहावं.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : आपल्याला झोपेत स्वप्न पडतात. स्वप्नात वेगवेगळ्या गोष्टी, घटना, माणसं दिसतात. कधीकधी आपण त्यांचे अर्थ लावत बसतो. परंतु काही स्वप्न खरोखर अर्थपूर्ण असतात आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. स्वप्नशास्त्रात असंही सांगितलेलं आहे की, स्वप्नात दिसणाऱ्या घटना या भविष्य आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी संबंधित असतात. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ हा वेगळा असतो. आज आपण जाणून घेणार आहोत, नेमकं असं स्वप्न कोणतं असतं, ज्यामुळे धनसंपत्तीबाबत संकेत मिळतात.
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, सध्या आपल्यासोबत काय घडतंय आणि भविष्यात काय घडणार आहे. ते स्वप्नात दिसतं. त्यापैकी काही दृश्य आपल्या वाट्याचं सुख दर्शवतात, तर काही दृश्य आपल्याला भोगावे लागणारे भोग दाखवतात. तसंच काही दृश्य पाहणं इतकं शुभ मानलं जातं की, त्यामुळे आपल्यावर आता धनसंपत्तीचा वर्षाव होणार आहे, हे कळतं.
advertisement
स्वप्नात जर लहान मुलं दिसली तर...
आपल्याला रात्रीच्या झोपेत पडलेल्या स्वप्नात लहान निरागस मुलं खेळताना, बागडताना दिसली की, समजून जायचं आता आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. आपली थांबलेली सर्व कामं आता मार्गी लागणार आहेत.
advertisement
स्वप्नात कलश दिसला तर...
स्वप्नात जर कलश दिसला तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो. त्याचा अर्थ असतो की लवकरच तुम्ही धनसंपत्तीने मालामाल होणार आहात.
पाण्याचा घडा दिसला तर...
स्वप्नात जर भरलेल्या पाण्याचा घडा दिसला, तर हा धनसंपत्तीच्या आगमनाचा शुभसंकेत असतो. त्यामुळेसुद्धा आपल्याला ऐश्वर्याची चाहूल लागते.
हिरवंगार शेत दिसलं तर...
स्वप्नात हिरवंगार बहरलेलं शेत दिसलं की, आयुष्यातल्या सर्व आर्थिक अडचणी आता भराभर संपणार असा त्याचा अर्थ होतो.
advertisement
घाण दिसली तर...
स्वप्नशास्त्रात असं सांगितलंय की, स्वप्नात घाण दिसणं म्हणजे नशिबाचं दार उघडलंच म्हणून समजायचं. आता आपल्याकडे कुठूनही पैसे येऊ शकतात. त्यामुळे आता आपण निश्चिंत राहावं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
February 28, 2024 10:30 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
रात्रीची स्वप्न असतात भारी, त्यात दिसल्या 'या' गोष्टी की, पैशांची भासत नाही कमी!


