मोठं कपाळ म्हणजे हुशार नाही; खरं गणित आहे 'हे', कळलं तर चमकेल नशीब!

Last Updated:

व्यक्तीच्या केसांखाली 9 रेषा असतात. या रेषा नवग्रहांचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे त्यांवरून भाग्य, भविष्य, आर्थिक स्थिती आणि स्वभावाबाबत माहिती मिळते. 9 पैकी 3 स्पष्ट रेषांवरून सारंकाही स्पष्ट कळतं.

कपाळावरील तीन रेषांच्या मधोमध गॅप असेल तर...
कपाळावरील तीन रेषांच्या मधोमध गॅप असेल तर...
अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी : आपल्या तळहातावरच्या रेषांवर आपलं नशीब लिहिलेलं असतं, असं म्हणतात. तसंच मोठं कपाळ असलेल्या व्यक्ती हुशार असतात, असंही आपल्या कधीतरी कानावर आलंच असेल. पण कपाळावर तर हातासारख्या ठळक रेषा दिसतच नाहीत, मग कसं कळतं नशीब? असं आपल्याला वाटत असेल, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या कपाळावर अतिमहत्त्वाच्या रेषा असतात. ज्यामुळे एखादी व्यक्ती राजाही होऊ शकते आणि एखादी व्यक्ती राजाची रंकही होऊ शकते.
advertisement
काशीचे ज्योतिषी पंडित संजय उपाध्याय सांगतात की, व्यक्तीच्या केसांखाली 9 रेषा असतात. या रेषा नवग्रहांचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यामुळे त्यांवरून भाग्य, भविष्य, आर्थिक स्थिती आणि स्वभावाबाबत माहिती मिळते. 9 पैकी 3 स्पष्ट रेषांवरून सारंकाही स्पष्ट कळतं.
advertisement
'या' व्यक्ती असतात ऐश्वर्याने संपन्न
ज्यांच्या कपाळावरील भाव ठळक दिसतात आणि त्यावर 3 रेषा सलग असतात, त्यात कोणताही अडथळा किंवा गॅप नसतो, त्या व्यक्तींचं आयुष्य भरपूर असतं. शिवाय त्या विद्या आणि ज्ञानाने परिपूर्ण असतात. त्यांच्याजवळ धनसंपत्तीही भरपूर असते. त्यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. शिवाय अशा व्यक्तींना मुलांकडूनही प्रचंड सुख मिळतं.
advertisement
...तर वाट्याला येतं दारिद्र्य
ज्या व्यक्तींच्या कपाळावरील 3 स्पष्ट रेषांपैकी पहिली आणि शेवटची रेष काहीशी कापलेली असेल तर त्यांना दारिद्र्याचा सामना करावा लागतो. शिवाय त्या आळशी असतात.
...तर पाण्यात बुडून अपघाताचा असतो योग
ज्या व्यक्तींच्या कपाळावरील रेषा डोंगरासारख्या वरच्या बाजूला झुकलेल्या असतील आणि त्यांमध्ये गॅप असेल तर अशा व्यक्तींसोबत पाण्यात बुडून अपघात होण्याचा योग असतो. त्यामुळे त्यांनी पाण्यापासून सावध राहावं किंवा उत्तम पोहायला शिकावं.
advertisement
...तर आयष्यात खूप करावा लागतो संघर्ष
ज्या व्यक्तींच्या कपाळावरील तीन रेषांच्या मधोमध गॅप असेल किंवा त्या स्पष्ट दिसत नसतील तर अशा व्यक्तींचं आयुष्य प्रचंड संघर्षात्मक असतं. त्यांना प्रत्येक कामात चढउतार पाहायला मिळतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
मोठं कपाळ म्हणजे हुशार नाही; खरं गणित आहे 'हे', कळलं तर चमकेल नशीब!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement