तुमच्या पर्सचा रंग काळा आहे? सांभाळून राहा, नाहीतर घडेल अनर्थ!

Last Updated:

जर आपण पर्सबाबतचे नियम पाळले तर आपली आर्थिक भरभराट व्हायला वेळ लागत नाही. आपलं पाकीट कायम पैशांनी भरलेलं राहतं.

सोबत पर्स असणं ही एक गरज झाली आहे.
सोबत पर्स असणं ही एक गरज झाली आहे.
अंजली शर्मा, प्रतिनिधी
कन्नौज : आजकाल घराबाहेर पडताना मोबाईल घ्यायला अगदीच कधीतरी आपण विसरतो. नाहीतर नेहमी मोबाईल आणि पर्स या दोन गोष्टी आठवणीने घेऊन घराबाहेर निघतो. आजकाल महागडे मोबाईल वापरण्याची फॅशन आहे हे आपल्याला माहितच असेल, पण लोक पर्सही फॅशनेबल वापरतात. परंतु तुम्हाला हे माहितीये का, पर्सच्या रंगावर आपलं नशीब अवलंबून असतं. आपल्याजवळ योग्य रंगाची पर्स असेल, तर आपल्याकडे लक्ष्मी देवी आकर्षित होते, अर्थातच आयुष्यातल्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात.
advertisement
तज्ज्ञ सिद्धी बरोले सांगतात की, काळ्या किंवा लाल रंगाच्या पर्समुळे आपल्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ होते. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. परंतु जर आपल्याकडे हिरव्या किंवा मातेरी म्हणजेच चॉकलेटी रंगाची पर्स असेल, तर आपली भरभराट होते. ती पर्स कायम पैशांनी भरलेली राहते.
advertisement
कधीकधी आपण आपल्या पर्समध्ये देवाचा फोटो ठेवतो. परंतु तज्ज्ञ सांगतात की, असं करणं चूक आहे. कधीच पर्समध्ये देवांचे फोटो ठेवू नये. त्यामुळे लक्ष्मी देवी आपल्यावर नाराज होते. अर्थातच त्या पर्समध्ये ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे येत नाहीत.
advertisement
सर्वांनी एक गोष्ट ठेवावी ध्यानात!
आता आपण पैशांचे ऑनलाइन व्यवहार करत असलो, तरी सोबत पर्स असणं ही एक गरज झाली आहे. जर आपण या पर्सबाबतचे नियम पाळले तर आपली आर्थिक भरभराट व्हायला वेळ लागत नाही. आपलं पाकीट कायम पैशांनी भरलेलं राहतं. शिवाय आपल्याला कधीच आर्थिक चणचण भासत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुमच्या पर्सचा रंग काळा आहे? सांभाळून राहा, नाहीतर घडेल अनर्थ!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement