चांगली झोप तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी, दिशेने आणि योग्य लाकडाच्या बेडवर आराम कराल. वास्तूनुसार तुमच्या बेडची रचना कशी असावी आणि बेड म्हणजे पलंग कोणत्या लाकडापासून बनलेला असावा ते जाणून घेऊयात.
बेडशी संबंधित वास्तू नियम
1. तुम्ही नेहमी दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपायला हवं. भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, धारदार वस्तू, अस्वच्छ वस्तू, खाण्याच्या वस्तू बेडखाली किंवा बेडवर ठेवू नयेत. असं केल्याने अचानक आणि असाध्य रोग होतात.
advertisement
2. बेड बनवण्यासाठी 16 ते 150 वर्षे वयोगटातील झाडांच्या लाकडाचा वापर करणे सर्वोत्तम मानले जाते. शिसवाच्या लाकडाचं वय 300 वर्षांपर्यंत असतं. शास्त्रामध्ये असं सांगितलंय की बाभूळ आणि चिंचेच्या लाकडावर नकारात्मक ऊर्जा आणि भूतांचा वास मानला जातो, त्यामुळे या झाडांच्या लाकडापासून बनवलेल्या बेडवर झोपल्याने मनुष्याला मानसिक अस्वस्थता, चिंता, भूत-प्रेत इत्यादी गोष्टींचा त्रास होतो.
3. वनस्पतींमध्ये पिंपळाला वृक्षराज म्हटलं जातं, त्यामुळे बेडसाठी त्याचा वापर करण्यास मनाई आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार पिंपळाचं झाड कापणं किंवा त्याला नुकसान पोहोचवणं हा अक्षम्य अपराध आहे. घरामध्ये वड, उंबर, कडूनिंब, कवठ, सोनचाफा, शिरस, कांचन वृक्ष इत्यादी लाकडाचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या झाडांचं लाकूड बेड बनवताना चुकूनही वापरू नये.
शुक्रवारी लक्ष्मीला अर्पण करा या 3 गोष्टी; रातोरात पालटेल नशीब, वाढेल धन-दौलत
या गोष्टींची काळजी घ्या
1. खैर, सागवान, अर्जुन, देवदार, अशोक, मोहाचं लाकूड आणि आंब्याच्या लाकडापासून बनवलेला बेड चांगला असतो.
2. मेटलचा बेड खरेदी करू नका, फक्त लाकडी बेड खरेदी करण्याचा प्रयत्न करा.
3. बेड गोल डिझाईनऐवजी आयताकार आकाराचा विकत घ्यावा किंवा बनवून घ्यावा.
4. बेडची लांबी झोपणाऱ्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असावी जेणेकरून पाय बेडच्या बाहेर जाणार नाहीत.
5. बेडच्या वरच्या बाजूला आरसा असणं हा वास्तुच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा दोष आहे. जर एखाद्या व्यक्तीला झोपताना आपलं प्रतिबिंब दिसलं तर तो वास्तू दोष आहे, या स्थितीमुळे आयुर्मान कमी होतं आणि दीर्घकाळ त्रास देणारे रोग होतात.
या जन्मतारखांच्या मुलींमध्ये उपजत असतो नेतृत्व गुण; अधिकारी बनून नाव कमावतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)