Shukrawar Upay शुक्रवारी देवी लक्ष्मीला अर्पण करा या 3 गोष्टी; रातोरात पालटेल नशीब, वाढेल धन-दौलत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukrawar Jyotish Upay: अनेक वेळा कष्ट करूनही लोकांना अपेक्षित यश मिळत नाही. खूप प्रयत्न करूनही अनेक लोक सुखी आणि शांत जीवन जगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना काही पूजा-विधी करण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्यांचे मन शांत होईल. उपवास आणि पूजा केल्यानं मनाला मानसिक शांतता लाभतेच शिवाय देवाच्या आशीर्वादानं त्रास-अडचणी दूर होतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते.
शुक्रवारी उपवास आणि पूजा केल्याने लोकांना आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व आहे. जे लोक आर्थिक संकटाने त्रस्त आहेत, त्यांनी शुक्रवारी काही वस्तू लक्ष्मीला अर्पण कराव्यात. यामुळे त्यांचे जीवन आनंदी होऊ शकते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊयात, शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात.
advertisement
पं. हितेंद्रकुमार शर्मा यांच्या मते, शुक्रवारी देवी लक्ष्मीला मोगऱ्याचं अत्तर अर्पण केल्यास सर्व समस्या दूर होऊ शकतात. मोगऱ्याचं अत्तर देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे, असे केल्याने धनाची देवता तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते. असे मानले जाते की, मोगरा अत्तर अर्पण केल्याने लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होते, घरात सुख-शांती राहते आणि धन-धान्याची कमतरता राहत नाही.
advertisement
advertisement
advertisement
ज्योतिषांच्या मते विवाहितांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीला सोळा श्रृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्याने वैवाहिक अडचणी दूर होतात आणि जीवन आनंदाने भरून जाते. शुक्रवारी पांढर्या वस्तूंचे दान करणे देखील खूप शुभ आणि लाभदायक मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)