किचन सिंकसाठी शुभ दिशा - किचन सिंक बसवण्यासाठी ईशान्य कोपरा (उत्तर-पूर्व दिशा) सर्वात उत्तम मानला जातो. या दिशेला जलतत्व मानले गेल्याने येथे सिंक असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि समृद्धी वाढते. भांडी घासताना व्यक्तीचे तोंड उत्तर दिशेला असेल अशा पद्धतीने सिंकची रचना करावी. यामुळे मानसिक शांती मिळते आणि घरात खुशहाली राहते.
advertisement
या दिशांना सिंक लावणे टाळा - नैऋत्य दिशा (दक्षिण-पश्चिम) सिंकसाठी अशुभ मानली जाते. या दिशेला सिंक असल्यास कुटुंबात विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो आणि घरामध्ये मतभेद वाढू शकतात. तसेच यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊन पैशांचे असंतुलन राहू शकते.
वर्षातील पहिली बॅडन्यूज..! दिनांक 7 जानेवारीपासून 3 राशींचा मजबूत किल्ला ढासळणार
अग्नी आणि जल तत्वातील अंतर - वास्तूमध्ये अग्नी (गॅस शेगडी) आणि जल (सिंक) हे एकमेकांचे विरोधी तत्व मानले जातात. जर गॅस शेगडी आणि सिंक अगदी जवळ असतील, तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबाच्या शांततेवर परिणाम होतो. त्यामुळे सिंक आणि शेगडीमध्ये थोडी अंतराची जागा असणे आवश्यक आहे.
सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा ठेवू नका - किचन सिंकच्या खाली डस्टबिन ठेवणे वास्तूच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे नकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डस्टबिन नेहमी किचनच्या एखाद्या वेगळ्या आणि झाकलेल्या जागी ठेवावे.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
