हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीचे जेवढे महत्त्व धार्मिक ग्रंथात सांगितले आहे, तेवढेच तिचे स्थान ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही सांगितले आहे. तुळशीच्या पूजेशी संबंधित काही नियम पाळले जातात. धार्मिक ग्रंथांमध्ये तुळशीच्या मुळांपासून पाने आणि देठांपर्यंत सविस्तर माहिती दिली आहे.
मंजिरीचे काय करावे?
तुळशीला मंजिरी आल्यावर त्या काढून फेकणे चुकीचे मानले जाते. मंजिरी आल्यावर त्याच्याशी संबंधित तीन गोष्टी कराव्यात. या गोष्टी केल्याने घर धन-धान्याने भरलेले राहते, असे मानले जाते. तुळशीला मंजिरी आल्यास त्यातील काही मंजिरी लाल कपड्यात गुंडाळून देव्हाऱ्यात ठेवा. तसेच घराच्या पूर्व दिशेला किंवा तिजोरीमध्येही मंजिरी ठेवू शकता. असे केल्याने धनाचे विविध मार्ग निर्माण होतील आणि आर्थिक लाभही होईल.
advertisement
मालव्य राजयोगामुळे खात्यात येणार बक्कळ पैसा; या राशींच्या नशिबात अचानक धनलाभ
या गोष्टींमध्ये तुळशीच्या मंजिरी टाका -
1- आंघोळीच्या पाण्यात तुळशीच्या मंजिरी टाकून आंघोळ करावी. असे केल्याने वास्तू दोष दूर होतात आणि ग्रह दोषांपासूनही मुक्ती मिळते.
2- पिण्याच्या पाण्यातही तुळशीच्या मंजिरी टाकून ठेवू शकता.
3- घरात धूप घालून धूर करत असताना त्यात तुळशीच्या मंजिरी जाळू शकता. यामुळे घरामध्ये मंगलमयता येते.
4- घरात दिवा लावताना त्यात मंजिरी घाला. असे केल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
झोपाळ्याचं वास्तुशास्त्र! घरात झोपाळा या दिशेला असणं शुभ, झुलण्यापूर्वी पहा नियम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)