TRENDING:

Vastu Tips: संध्याकाळी झाडू मारल्यास काय होतं? वास्तुशास्त्रात सांगितल्यात इतक्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी

Last Updated:

Vastu Tips Of Broom: झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडू म्हणजे फक्त स्वच्छता नव्हे, तर दुर्भाग्य, दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारी वस्तू असंही मानलं जातं. म्हणूनच वास्तु आणि ज्योतिषात झाडूला विशेष स्थान आहे. तुम्ही संध्याकाळी झाडू वापरत असाल, तर

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र असून त्याचा आपल्या आयुष्यावर खूप खोल परिणाम होतो. घर कसं असावं याची सगळी माहिती त्यात सांगितली जाते, वास्तुशास्त्रानुसार असलेल्या घरात सुख-शांती, समृद्धी टिकून राहते. घराशी संबंधित अनेक नियम वास्तूत सांगितले आहेत, त्याचपैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे झाडूसंबंधीचा. झाडू ही एक घरातील महत्त्वाची गोष्ट आहे, त्याविषयी काही गोष्टी आपणास माहीत असायलाच हव्या.
News18
News18
advertisement

झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडू म्हणजे फक्त स्वच्छता नव्हे, तर दुर्भाग्य, दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर करणारी वस्तू असंही मानलं जातं. म्हणूनच वास्तु आणि ज्योतिषात झाडूला विशेष स्थान आहे. तुम्ही संध्याकाळी झाडू वापरत असाल, तर काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगितलं जातं. नाहीतर घरात त्रास, अडचणी आणि अशुभ परिणाम दिसू शकतात. जाणून घेऊया संध्याकाळच्या वेळी झाडूसंबंधी वास्तुनुसार कोणते नियम सांगितले आहेत.

advertisement

संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये -

हिंदू परंपरेनुसार झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे. जाणकार लोक नेहमी सांगतात की, संध्याकाळी घरात झाडू लावू नये. वास्तुनुसार, सूर्यास्तानंतर झाडू लावल्याने लक्ष्मी रुसते आणि घरात दारिद्र्य येतं. म्हणून सूर्य मावळल्यानंतर झाडू मारणं टाळावं. जर खूपच गरज असेल, तर झाडूला नमस्कार करून मग वापरावी. संध्याकाळी झाडू वापरल्यानं घरातील सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीची कृपा दोन्ही कमी होतात, अशी धारणा आहे.

advertisement

झाडू कुठे ठेवावा -

वास्तुशास्त्र सांगतं की झाडू कधीही घरातील अस्वच्छ जागेजवळ किंवा कचरापेटीजवळ ठेवू नये. अशा ठिकाणी झाडू ठेवली तर वास्तुदोष निर्माण होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.

लक्ष्मीचे प्रतीक असलेली झाडू नेहमी स्वच्छ जागेवर ठेवावी. घराच्या पश्चिम दिशेला किंवा नैऋत्य दिशेला (दक्षिण-पश्चिम) झाडू ठेवणं खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने सुख-समृद्धी आणि सौभाग्य वाढतं. खूप लोक झाडू वापरल्यानंतर तो भिंतीला टेकवून उभा ठेवतात, वास्तुनुसार हे चुकीचं आहे. असं केल्याने झाडूचा अपमान होतो. झाडू नेहमी जमिनीवर आडवा ठेवा. घरात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या पायाखाली झाडू येऊ नये, याची काळजी घ्यावी. झाडूवर पाय पडणं हे अपशकुन मानलं जातं. चुकून झाडूवर पाय गेला, तर झाडूला हलकं हात लावून माफी मागावी.

advertisement

असा झाडू घरात ठेवू नये - वास्तुनुसार तुटका, जीर्ण किंवा जास्त घासलेला झाडू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. अशा झाडूने वास्तुदोष निर्माण होतो आणि लक्ष्मी नाराज होते, अशी मान्यता आहे. बेकार, तुटकी झाडू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि त्यामुळे पैशाचं नुकसान होण्याची शक्यता असते.

वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाचे तांडव ते चर्चेचा विषय ठरलेला बिबट्या, पुण्यात इथं भरलंय चित्र प्रदर्शन
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: संध्याकाळी झाडू मारल्यास काय होतं? वास्तुशास्त्रात सांगितल्यात इतक्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल