महाराष्ट्राचा ऑलराऊंडर अर्शीन कुलकर्णी हा सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात अर्शीनने 67 रनची खेळी केली. त्याआधी मुंबईविरुद्धच्या सामन्यात अर्शीनने 114 बॉल 114 रन केले आणि त्यानंतर त्याने 3 बॉलमध्ये एक विकेटही घेतली. या कामगिरीबद्दल अर्शीनला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सने अर्शीन कुलकर्णीला 30 लाख रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. ओपनिंग बॅटिंगसह अर्शीन फास्ट बॉलिंगही करतो, त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातला ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जात आहे. 2024 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये अर्शीन कुलकर्णीने युएसएविरुद्ध 108 रनची खेळी केली होती. तसंच युएसए आणि नेपाळविरुद्ध त्याने महत्त्वाच्या विकेटही घेतल्या होत्या.
advertisement
अर्शीन कुलकर्णीचा जन्म सोलापूरचा असून तो 20 वर्षांचा आहे. ऑलराऊंडर असलेला अर्शीन कुलकर्णी महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेट खेळत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्येही अर्शीनने शतक झळकावलं होतं. आयपीएल 2024 च्या लिलावात लखनऊ सुपर जाएंट्सने अर्शीनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. येत्या काही वर्षात अर्शीन कुलकर्णीने त्याच्याकडून अपेक्षा असलेली कामगिरी केली, तर त्याची नक्कीच टीम इंडियामध्ये एन्ट्री होईल. अर्शीन हा टीम इंडियाच्या कॅप्टनला ओपनिंग बॅटिंगसोबतच फास्ट बॉलिंगचाही पर्याय देऊ शकतो.
