अभिमन्यूची बॅट तळपली
गेल्या सामन्यात अभिमन्यूची बॅट शांत होती, परंतु दुसऱ्या सामन्यात संघाच्या कर्णधाराने अर्धशतक झळकावून शानदार खेळी केली. अभिमन्यू ईश्वरनला इंडिया ए संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अभिमन्यू 13 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधाराच्या बॅटमधून धावा आल्या. दुसऱ्या डावात अभिमन्यू ईश्वरनने 92 चेंडूत 80 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. फक्त काही धावांनी त्याचं शतक हुकलं. पण त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होऊ शकतो.
advertisement
रोहितचा वासरदार ठरला
पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करताना अभिमन्यूने केएल राहुलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 88 धावा जोडल्या. अभिमन्यूला यापूर्वीही भारतीय कसोटी संघात संधी देण्यात आली होती, परंतु त्याला शेवटच्या 11 मध्ये संधी मिळाली नाही. तथापि, रोहितच्या निवृत्तीनंतर यावेळी अभिमन्यूचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण निश्चित दिसते. अभिमन्यूने 102 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7750 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 27 शतके केली आहेत, तर 30 अर्धशतकेही त्याच्या बॅटमधून आली आहेत.
ओपनिंगला कोण?
करुण नायरने इंडिया ए संघाच्या सराव सामन्यात शानदार कामगिरी केली आणि द्विशतक झळकावले. याआधी करुणने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे करुण नायर सलामीवीर म्हणून पर्याय असू शकतो. तसेच दुसरीकडे केएल राहुलने देखील शतक ठोकून दंड थोपटले आहेत. त्यामुळे आता इश्वरनला संधी मिळणार का, हे पहावं लागेल.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया :
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईसवरन, मोहम्मद जयस्वार, मोहम्मद जयस्वार, बी.एस. प्रसिध कृष्णा, करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.