टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक नायर लवकरच मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत आहेत. तसेच या संदर्भात औपचारिक घोषणा पुढील आठवड्यात केली जाईल," असे एका विश्वसनीय सूत्राने देखील सांगितले आहे.
दरम्यान,मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज अमित दाणी हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि माजी गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांब्रे, जे सध्या मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत, ते एआरसीएस अंधेरीचे मुख्य प्रशिक्षक असतील. मुंबईचे माजी डावखुरा फिरकी गोलंदाज राजेश पवार हे अंधेरी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. भारताचे माजी संघाचे मालिश करणारे रमेश माने हे संघाचे मालिश करणारे असतील, तर मुंबईचे माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक अमोघ पंडित हे संघाचे प्रशिक्षक असतील.
advertisement