मुंबई इंडियन्सचा आयपीएलचा प्रवास संपला
रविवारी, 1 जूनला मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जचा अटीतटीचा सामना खेळला गेला या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पावसाच्या मोडत्यानंतरही हा सामना निर्धारित 20 ओव्हर्सचा सामना खेळला गेला. या निर्धारित 20 ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 203 धावांचा डोंगर पंजाब समोर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने हे लक्ष भेदले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. या सामन्यात अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे चाहत्यांनी श्वास धरून ठेवला पण अखेर खेळाचा भागच आहे कोणाचा विजय तर कोणाचा पराभव. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाचा प्रवास संपला.
advertisement
एकीकडे सेलिब्रेशन दुसरीकडे बुमराहने जिंकलं मन
मुंबई इंडियन्सने जिंकलेला सामना कसा हरला? मुंबई इंडियन्सने सुरवातीच्या ओव्हर्समध्ये अनेक रन्स दिले. जसप्रीत बुमराहची पाचवी ओव्हर मुंबईसाठी घातक ठरली. या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या ओव्हरला जोश इंग्लिशने 20 रन्स पटकावले. तर शेवटची ओव्हर मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट स्वप्न ठरली. अश्वनी कुमारने शेवटची ओव्हर टाकली. नवख्या अश्वनी कुमारला पंजाबच्या कर्णधाराने न जुमानता 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारले आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के करत मुंबईच्या आयपीएलच्या या प्रवासाला फुलस्टॉप लावला. पंजाबने सामना जिंकताच सर्वत्र उत्सवाचं वातावरण पाहायला मिळाल. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह चाहत्यांमध्येही निराशा पाहायला मिळाली. पण या दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली. एकीकडे सर्व पंजाबचा विजय साजरा करत असताना. अश्वनी कुमार ज्याच्या ओव्हरमध्ये पंजाबने हा सामना जिंकला त्याची निराशा उघड दिसत होती अश्या वेळी दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराहने त्याचे सांत्वन केल्याचे दिसून आले.
पंजाबचं मुंबईवर वर्चस्व
गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबने डावाला सुरवात केली आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या क्षेत्ररक्षणात चुका नजर आल्या. पहिल्या डावात म्हणजे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीत मुंबईने 6 विकेट गमावत 203 धावा केल्या. पंजाब समोर 203 धावांचा लक्ष ठेवल्या नंतर पंजाबनेही त्यांचं कौशल दाखवत मुंबईवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. सुरुवातीला पंजाबने देखील काही विकेट्स गमावल्या आणि तेव्हा सामना हातातून निसटलं असे वाटत असताना श्रेयसने डाव सावरला.