टीम इंडियाच्या अमित मिश्रावर एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आणि तिला शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांचा अमित मिश्राच्या क्रिकेट करिअरवर मोठा परिणाम झाला होता. तसेच या प्रकरणाची त्यावेळेस खूप चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात अमित मिश्राला अटक देखील करण्यात आली होती.त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. या घटनेनंतर अमित मिश्राने ही संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे.
advertisement
2015 सालचं हे प्रकरण आहे. अमित मिश्रावर त्यावेळी एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. यासोबत तिला शिविगाळ केल्याचाही आरोप झाला होता. हॉटेलच्या रुममध्ये त्याने तिच्यासोबत हे सगळ कृत्य केल्याचा आरोप तिने केला होता.
या आरोपानंतर अमित मिश्राची पोलिसांनी 3 तास चौकशी केल्यानंतर त्याला सोडून दिले होते. त्यानंतर त्याने एका मुलाखतीत हा सपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. मी त्याला मुलीला मागच्या 2 वर्षापासून ओळखत होतो ती माझी मैत्रिण होती. ती बंगळुरूची राहणारी होती.पण तिला काही चुकीच्या लोकांसोबत पाहून मी तिच्याशी बोलण बंद केलं होतं.त्यानंतर तिने मला सतत फोन करून त्रास दिला होता.एक दिवशी तर काय झालं मी माझ्या मित्रांसोबत डीनर करून हॉटेलवर परतल्यानंतर मला कळालं की, माझ्या परवानगी शिवाय एक मुलगी माझ्या रुममध्ये घुसली होती, असे मिश्राने सांगितले होते.
मी सर्वात आधी मॅनेजरला फोन केला.जर मी त्या दिवशी मॅनेजरला फोन केला नसता तर मी पकडलो गेलो असतो.मी मॅनेजरला सीसीटीव्ही कॅमेरा बंद करू नका असे सांगितले. मॅनेजर आल्यावर तिला खोलीतून हाकलून लावण्यात आले होते. या प्रकरणात अमित मिश्राला अडकवण्याचा प्रयत्न सूरु होता.
पण ती तरूणी रुममध्ये घुसली तरी कशी,यावर अमित मिश्रा म्हणाला, ती मुलगी कदाचित त्या हॉटेलची सदस्य असेल किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आले असतील.तसेच तिने लेडीज प्रॉब्लेम सांगत,माझा नवरा खाली असल्याचे सांगत रूममध्ये घुसखोरी केली होती. या घटनेने अमित मिश्रा प्रचंड अडचणीत साडपला होता.