ऋषभ आणि राहुलवर सडकून टीका
शोएब बशीरच्या बॉलवर रन घेण्याची घाई त्याला महागात पडली. राहुलला स्ट्राईक देण्याच्या नादात ऋषभ रनआऊट झाला. तो रन आऊट होताच, लगेच दुपारच्या जेवणाची घोषणा झाली. या विकेटमुळे इंग्लंडला दुसऱ्या सत्रात पुन्हा जोर पकडण्याची संधी मिळाली. यामुळे आता टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे याने ऋषभ आणि राहुल यांच्यावर सडकून टीका केली.
advertisement
काय म्हणाला अनिल कुंबळे?
मला वाटतं की रिषभ पंतने आधी धाव घेण्याचा विचार केला, पण नंतर त्याला वाटलं की धाव मिळणार नाही. पण जेव्हा केएल राहुल क्रीझमधून बाहेर आला, तेव्हा रिषभ पंतला धाव घ्यावी लागली. खरं तर ती धाव घेण्याची गरज नव्हती. तो अजून तीन बॉल थांबून जेवणासाठी जाऊ शकला असता आणि नंतर खेळ सुरू करू शकला असता, असं अनिल कुंबळे म्हणाला.
"त्याला रात्रभर वाट पहावी लागली"
याची काहीच गरज नव्हती. एकदा जो रूट 99 धावांवर होता, तेव्हा त्याला रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण करावं लागलं होतं. पंत आणि राहुलने खूप चांगली पार्टनरशिप केली होती. पण या धावबादमुळे इंग्लंडला दुसऱ्या सत्रात जाण्यापूर्वी थोडा आत्मविश्वास मिळाला, असंही अनिल कुंबळे म्हणाला आहे.
दरम्यान, लंचपूर्वी, रिषभ पंत 112 बॉलमध्ये 74 धावा काढून धावबाद झाला. लंचनंतर लगेचच केएल राहुलने आपलं शतक पूर्ण केलं. पण शतक झाल्यावर लगेचच राहुलही शोएब बशीरच्या बॉलवर 100 धावा काढून आऊट झाला. या दोन महत्त्वाच्या विकेट्समुळे इंग्लंडने मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि भारताला 387 धावांवर ऑल आऊट केलं.