TRENDING:

Sachin Tendulkar : 13 ऑगस्टला मुलाचा साखरपुडा, पण 14 ऑगस्ट आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही सचिन तेंडुलकर!

Last Updated:

13 ऑगस्टला सचिन तेंडुलकरच्या मुलाचा साखरपुडा झाला असला तरी सचिन तेंडुलकर याच्यासाठी 14 ऑगस्ट या तारखेचं आयुष्यात सर्वात मोठं स्थान आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने साखरपुडा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. 13 ऑगस्ट 2025 ला अर्जुन तेंडुलकरचा मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी साखरपुडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या समारंभाला फक्त कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते, पण अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याबाबत तेंडुलकर किंवा घई कुटुंबाकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
13 ऑगस्टला मुलाचा साखरपुडा, पण 14 ऑगस्ट आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही सचिन तेंडुलकर!
13 ऑगस्टला मुलाचा साखरपुडा, पण 14 ऑगस्ट आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही सचिन तेंडुलकर!
advertisement

13 ऑगस्टला सचिन तेंडुलकरच्या मुलाचा साखरपुडा झाला असला तरी सचिन तेंडुलकर याच्यासाठी 14 ऑगस्ट या तारखेचं आयुष्यात सर्वात मोठं स्थान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक करण्याचा सचिनचा प्रवास 14 ऑगस्टपासूनच सुरू झाला होता. सचिन तेंडुलकरने त्याचं पहिलं शतक वयाच्या 17व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध केलं होतं. सचिनने हे शतक जेव्हा झळकावलं तेव्हा टीम इंडिया ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात पराभवाच्या दारात होती. सचिनच्या शतकामुळेच टीम इंडियाला हा सामना ड्रॉ करण्यात यश आलं.

advertisement

सचिन तेंडुलकरची टेस्ट क्रिकेटमधली पहिली शतकी खेळी 119 रनची होती. 1990 साली टीम इंडिया मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. सीरिजच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने भारताला विजयासाठी 408 रनचं आव्हान दिलं. याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 183 रनवरच 6 विकेट गमावल्या होत्या, पण एका बाजूने सचिनने किल्ला लढवला. 189 बॉलमध्ये सचिनने 119 रनची खेळी केली.

advertisement

सचिन तेंडुलकरला दुसऱ्या बाजूने मनोज प्रभाकरची साथ मिळाली. प्रभाकरने 67 रनची नाबाद खेळी केली. तर सचिन 119 रनवर नाबाद राहिला. सचिन आणि प्रभाकरने शेवटच्या दिवशी अडीच तास इंग्लंडला विकेट मिळवून दिली नाही आणि मॅच ड्रॉ केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 343/6 एवढा होता.

advertisement

सचिन तेंडुलकरने जेव्हा हे शतक ठोकलं तेव्हा त्याचं वय 17 वर्ष आणि 112 दिवस होतं. याचसोबत सचिन टेस्ट मॅचमध्ये सगळ्यात लहान वयात शतक ठोकणारा भारतीय खेळाडू बनला. वयाच्या 17व्या वर्षी सचिनने दाखवलेलं धैर्य आणि तंत्रामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

1989 साली पाकिस्तानविरुद्ध पहिली टेस्ट खेळणाऱ्या सचिनने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं होती. सचिनच्या नावावर 200 टेस्टमध्ये 51 शतकं आणि 15,921 रन होत्या. जगातल्या कोणत्याही क्रिकेटपटूला टेस्ट क्रिकेटमध्ये 50 शतकं करता आलेली नाहीत. याशिवाय सचिनने 463 वनडे सामन्यांमध्ये 49 शतकांच्या मदतीने 18,426 रन केल्या. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनचा विक्रम अजूनही सचिनच्या नावावर आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा सचिनचा विक्रम विराट कोहलीने मोडला. विराटच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 51 शतकं आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sachin Tendulkar : 13 ऑगस्टला मुलाचा साखरपुडा, पण 14 ऑगस्ट आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही सचिन तेंडुलकर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल