TRENDING:

ICC Player Of The Year: भारताच्या टी-२० वर्ल्डकपचा हिरो अर्शदीप, महिला संघाची स्टार स्मृती मंधाना ICC पुरस्काराचे नामांकन

Last Updated:
impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई: भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि स्पर्धेत संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा जलद गोलंदाज अर्शदीप सिंह याची आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. २५ वर्षीय अर्शदीप सोबत पाकिस्तानचा बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, झिम्बाब्वेचा सिंकदर रझा यांना देखील नामांकन मिळाले आहे.
News18
News18
advertisement

महिलांमध्ये भारताची सलामीवीर स्मृती मंधानालाही आयसीसी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर’साठी नामांकित करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड्ट, श्रीलंकेची चामरी अटापट्टू आणि ऑस्ट्रेलियाची अनाबेल सदरलँड या खेळाडूना नामांकन मिळाले आहे.

भारतीय संघ WTCच्या फायनलमध्ये कसा पोहोचणार? नवे समीकरण समोर आले

advertisement

अर्शदीप टी-20 विश्वचषक विजयातील हिरो

वेगवान गोलंदाज अर्शदीपने बार्बाडोस येथे भारताच्या टी-20 विश्वचषक विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने 18 सामन्यांमध्ये 13.5 च्या सरासरीने 36 बळी घेतले होते. इतकेच नाही तर टी-20 क्रिकेटमध्ये या वर्षी अर्शदीपने संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेतले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या 2022 मधील 37 बळींनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात हे भारतीय वेगवान गोलंदाजाचे दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

advertisement

ऑस्ट्रेलियाकडून झाली मोठी चूक; भारताला हलक्यात घेतले, मेलबर्नवर इतिहास घडणार

अर्शदीपने टी-20 विश्वचषकात 17 बळी घेतले होते. अशीच कामगिरी अफगाणिस्तानच्या फझलहक फारूकीसह संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेतलेले गोलंदाज ठरले. अर्शदीपने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात होते एडेन मार्क्रम आणि क्विंटन डी कॉक यांसारख्या प्रमुख खेळाडूंना लवकर बाद करून दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला होता. 19 व्या षटकात त्याने फक्त चार धावा दिल्या ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला.

advertisement

स्मृती मंधानाने 12 डावांमध्ये 61.91 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 96.99 च्या स्ट्राईक रेटने 743 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत एक बळीही घेतला. 28 वर्षीय मंधानाने जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बंगळुरू येथे दोन शतके झळकावून 2024ची सुरुवात केली होती. त्यानंतर वर्षभर तिने दमदार कामगिरी केली.

मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला किती ओव्हर्स मिळणार?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

मंधानाने जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन डावांमध्ये एकूण 343 धावा केल्या आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरव मिळवला. तिने वर्षातील तिसरे शतक महिला टी-20 विश्वचषक पूर्ण झाल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झळकावले होते. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात तिने चौथे शतक पूर्ण केले.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ICC Player Of The Year: भारताच्या टी-२० वर्ल्डकपचा हिरो अर्शदीप, महिला संघाची स्टार स्मृती मंधाना ICC पुरस्काराचे नामांकन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल