IND vs AUS Test: मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला किती ओव्हर्स मिळणार? काय असेल रणनिती

Last Updated:
News18
News18
मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली चौथी कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ९ बाद २२८ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडे ३३३ धावांची आघाडी झाली असून उद्या कसोटीचा अखेरचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या विकेटने ५५ धावांची भागिदारी केली असून पाचव्या दिवशी ही जोडी किती मैदानावर थांबते यावर भारताचे टार्गेट निश्चित होणार आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रयत्न असेल तो मेलबर्नमध्ये विजय मिळून मालिकेत आघाडी घेण्याचा होय. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा डाव अद्याप घोषीत केला नाही त्यामुळे भारताला ३३४ धावांचे टार्गेट मिळणार की त्याहून जास्त यासाठी उद्याची वाट पहावी लागले. ऑस्ट्रेलियाची अखेरची जोडी मैदानावर आली आणि लवकर बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले तर टीम इंडियासाठी अखेरच्या दिवशी ३५० हून कमी धावांचे टार्गेट असेल. यासाठी भारताला ९६ ओव्हर्स असतील.
advertisement
नितीश कुमारचे शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान शतकांपैकी एक
पाचव्या दिवशी भारताला ९० षटके खेळण्यास मिळाली तर टीम इंडिया विजयावर दाव लावणार की सामना ड्रॉ करून पाचव्या आणि अखेरची कसोटी जिंकण्यासाठी प्रयत्न करेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे. भारतीय संघाची फलंदाजी पाहता एका दिवसात ३००हून अधिक धावा करण्यासाठी संघाला वेगाने धावा कराव्या लागतील. जर फलंदाज मैदानावर टीकले नाही तर सामना गमवण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या भारतीय संघ काय रणनितीने मैदानात उतरतो त्यावर मॅचचा निकाल ठरेल.
advertisement
कोणत्याही हिंदूने जमीन दिलेली नाही, मौलाना कुंभमेळ्याबद्दल बोलले
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ७० धावा केल्या. तर कर्णधार पॅट कमिन्सने ४१ आणि नाथन लायनने नाबाद ४१ धावांचे योगदान दिले आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या असून मोहम्मद सिराजने ३ तर रविंद्र जडेजाने १ विकेट घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS Test: मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला किती ओव्हर्स मिळणार? काय असेल रणनिती
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement