आशिया कपमध्ये अनेक भाषांमध्ये समालोचन केले जाणार आहे. यामध्ये हिंदी समालोचन करण्यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.यात वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, अजय जडेजा, विवेक राजदान, अभिषेक नायर, सबा करीम, गौरव कपूर, आतीश ठुकराल, समीर कोचर यांची नावे आहेत. यामधील इरफान पठाणची आयपीएलच्या काँमेंट्री पॅनेलमधून हकालपट्टी करण्यात आली होती. पण आता आशिया कपसाठी त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
advertisement
सामन्याच्या वेळेत मोठा बदल
आशिया कप 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील असे सांगण्यात आले होते, परंतु सध्या यूएईमध्ये खूप उष्णता आहे, त्यामुळे सामने अर्धा तास पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आता भारत आणि यूएई यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल ज्यामध्ये टॉस संध्याकाळी 7.30 वाजता होईल.
सामने कुठे पाहता येणार?
तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आशिया कप 2025 पाहू शकता.भारतीय चाहते सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेलवर आशिया कपचे सर्व सामने पाहू शकतील. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर ऑनलाइन दाखवले जाईल, जे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरच नाही तर स्मार्ट टीव्हीवरही पाहू शकता.
आशिया कपसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.