या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलला पाकिस्तानची पहिली विकेट गेली. ओपनर सॅम अयुब पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर पाकिस्तानला एकामागोमाग एक धक्के लागले. पाकिस्तानचा स्कोअर 100 रनपर्यंतही जाणार नाही, असं वाटत होतं. पण नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शाहिन आफ्रिदीने 16 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले, त्यामुळे पाकिस्तानला 127 रनपर्यंत मजल मारता आली.
advertisement
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर बुमराह आणि अक्षर पटेलला 2-2 आणि हार्दिक पांड्या वरुण चक्रवर्तीला 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडिया सुपर-4 मध्ये
आशिया कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आधी युएई आणि मग पाकिस्तानचा पराभव केला, त्यामुळे तिसरा सामना खेळण्याआधीच टीम इंडिया सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना ओमानविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.