TRENDING:

W, 1, 0, W, 2, W... ज्याच्या खेळण्यावरून वाद, त्याने एकाच ओव्हरमध्ये संपवली मॅच, गंभीरचा हुकमी एक्का

Last Updated:

आशिया कप 2025 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने युएईचा धुव्वा उडवला आहे. आधी युएईचा 57 रनवर ऑल आऊट केल्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 4.3 ओव्हरमध्येच फक्त एक विकेट गमावून पार केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आशिया कप 2025 च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने युएईचा धुव्वा उडवला आहे. आधी युएईचा 57 रनवर ऑल आऊट केल्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 4.3 ओव्हरमध्येच फक्त एक विकेट गमावून पार केलं. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी सूर्यकुमार यादवचा हा निर्णय अगदी योग्य ठरवला. या सामन्यात टीम इंडिया बुमराहच्या रुपात फक्त एक स्पेशलिस्ट फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरली होती.
W, 1, 0, W, 2, W... ज्याच्या खेळण्यावरून वाद, त्याने एकाच ओव्हरमध्ये संपवली मॅच, गंभीरचा हुकमी एक्का
W, 1, 0, W, 2, W... ज्याच्या खेळण्यावरून वाद, त्याने एकाच ओव्हरमध्ये संपवली मॅच, गंभीरचा हुकमी एक्का
advertisement

टी-20 क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या अर्शदीप सिंगला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्शदीप सिंगऐवजी भारताने कुलदीप यादवला मैदानात उतरवलं. सुरूवातीला या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता, पण कुलदीपने त्याच्या एका ओव्हरमध्येच मॅचचं चित्र बदलून टाकलं.

एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट

कुलदीप यादवने एकाच ओव्हरमध्ये युएईच्या 3 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीप बॉलिंगला आला तेव्हा युएईचा स्कोअर 9 ओव्हरमध्ये 47 रनवर 2 विकेट एवढा होता. या ओव्हरच्या पहिल्या, चौथ्या आणि सहाव्या बॉलला कुलदीपने विकेट घेतल्या, त्यामुळे युएईची अर्धी टीम 50 रनवरच आऊट झाली होती.

advertisement

कुलदीप यादवने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. इनिंगच्या 9व्या ओव्हरमध्ये त्याने राहुल चोप्राला आऊट केलं, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर कर्णधार मोहम्मद वसीम आणि मग शेवटच्या बॉलवर हर्षित कौशिकला माघारी धाडलं. याशिवाय कुलदीपने हैदर अलीचीही विकेट मिळवली. या सामन्यात कुलदीपने 2.1 ओव्हरमध्ये 7 रन देऊन 4 विकेट घेतल्या.

युएईचा 57 रनवर ऑलआऊट

advertisement

या सामन्यात युएईचा फक्त 57 रनवर ऑलआऊट झाला. कुलदीप यादवच्या 4 विकेटशिवाय शिवम दुबने 3 विकेट घेतल्या. तसंच वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
W, 1, 0, W, 2, W... ज्याच्या खेळण्यावरून वाद, त्याने एकाच ओव्हरमध्ये संपवली मॅच, गंभीरचा हुकमी एक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल