आशिया कपसाठी शुभमन गिलचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं, याचसोबत गिलला टीमचं उपकर्णधारही बनवण्यात आलं. गिलच्या कमबॅकमुळे ओपनिंगला कोण बॅटिंग करणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, कारण मागचं वर्षभर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टी-20 मध्ये भारतासाठी ओपनिंग केली होती आणि त्यांचं रेकॉर्डही उत्कृष्ट होतं, त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांची डोकेदुखी वाढली होती.
advertisement
आशिया कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये भारतासोबत युएई, पाकिस्तान आणि ओमानच्या टीम आहेत. ग्रुप स्टेजमध्ये 3 पैकी 2 मॅच जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये प्रवेश करणार आहे. युएईविरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवून आशिया कपची दणक्यात सुरूवात करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
टीम इंडियाची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती