कोण आहेत पीव्हीआर प्रशांत?
आता प्रश्न असा आहे की पीव्हीआर प्रशांत कोण आहेत? टीम इंडियाचे नवे मॅनेजर म्हणून प्रशांत यांची नियुक्ती झालेली आहे. पीव्हीआर प्रशांत हे आमदाराच्या कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील देखील आमदार राहिले आहेत आणि त्यांचे सासरे देखील आमदार आहेत. त्यामुळे भारतीय टीमचे नवे मॅनेजर हे आमदाराचे जावई आहेत.
advertisement
पीव्हीआर प्रशांत यांचे वडील पुलपार्थी रमणजनेयुलु, ज्यांना अंजी बाबू म्हणूनही ओळखले जाते, ते 2009 ते 2014 पर्यंत आमदार होते. मार्च 2024 मध्ये ते पवन कल्याणच्या जनसेना पक्षात सामील झाले. पीव्हीआर प्रशांत यांचे सासरे जी. श्रीनिवास राव 2024 मध्ये भिमली येथून आमदार झाले. ते आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पक्षाचे नेते आहेत. प्रशांत यांचे सासरे आंध्र प्रदेशचे मानव संसाधन आणि विकास मंत्री देखील राहिले आहेत.
आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष
पीव्हीआर प्रशांत यांच्या स्वतःच्या प्रशासकीय आणि क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांनी ओल्ड वेस्ट गोदावरी टीमसोबत जिल्हा पातळीवर क्रिकेट देखील खेळलं आहे.
टीम इंडियाच्या मॅनेजरचं काम काय?
टीम मॅनेजरच्या भूमिकेसाठी पीव्हीआर प्रशांत यांची आशिया कपमध्ये निवड झाली आहे. त्या भूमिकेत त्याचे काम काय असेल? टीम मॅनेजर म्हणून, तो आशिया कप दरम्यान खेळाडूंच्या प्रत्येक लहान-मोठ्या गरजांची काळजी घेतील. तो बीसीसीआय आणि टीममध्ये दुवा म्हणून काम करतील.
आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या सामन्यांना 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. युएईविरुद्धचा पहिला सामना खेळल्यानंतर भारतीय टीम 14 सप्टेंबरला दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल.