हार्दिक पांड्याने मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलला विकेट घेतली. मॅचचा पहिला बॉल वाईड टाकल्यानंतर हार्दिकने पुढच्याच बॉलला विकेट घेतली. सॅम अयुब स्पर्धेत लागोपाठ दुसऱ्या मॅचला पहिल्या बॉलला शून्य रनवर आऊट झाला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल यांना 2-2 आणि हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
आशिया कपच्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. सलमानच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, कारण या दोन्ही टीममध्ये दुबईच्या मैदानात 3 मॅच झाल्या आहेत आणि तीनही सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमने विजय मिळवला आहे. तसंच दुबईमध्ये 2018 नंतर कोणत्याच टीमला टॉस जिंकून बॅटिंग केल्यानंतर मॅच जिंकता आलेली नाही.
...तर टीम इंडिया सुपर-4 मध्ये
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विजय मिळवला तर भारतीय टीम सुपर-4 मध्ये क्वालिफाय करेल, कारण भारताने आधीच युएईचा पराभव केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानला सुपर-4 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर त्यांना युएईविरुद्धची मॅच जिंकावी लागेल.
भारतीय टीम
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती