युएईच्या 58 रनचा पाठलाग करताना भारताकडून अभिषेक शर्माने 16 बॉलमध्ये 30 आणि शुभमन गिलने 9 बॉलमध्ये नाबाद 20 रन केले. कर्णधार सूर्यकुमार यादवने 2 बॉलमध्ये नाबाद 7 रनची खेळी केली. युएईकडून जुनैद सिद्दीकीने अभिषेक शर्माची विकेट घेतली.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉलर्सनी युएईचा 57 रनवर ऑलआऊट केला. 47 रनवर युएईने त्यांची तिसरी विकेट गमावली होती, म्हणजेच 10 रनमध्येच त्यांच्या शेवटच्या 8 विकेट गेल्या. भारताकडून कुलदीप यादव हा सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. कुलदीपने 2.1 ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 4 विकेट घेतल्या, यातल्या 3 विकेट कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये मिळवल्या.
advertisement
कुलदीप यादवशिवाय शिवम दुबेने 3 विकेट घेतल्या, तर बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर आलिशान शरफू आणि मोहम्मद वसीम या दोन्ही ओपनरनी युएईला चांगली सुरूवात करून दिली. शरफूने 22 तर वसीमने 19 रन केले, पण यानंतर युएईच्या कोणत्याही बॅटरला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.