कुलदीप यादवशिवाय शिवम दुबेने 3 विकेट घेतल्या, तर बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर आलिशान शरफू आणि मोहम्मद वसीम या दोन्ही ओपनरनी युएईला चांगली सुरूवात करून दिली. शरफूने 22 तर वसीमने 19 रन केले, पण यानंतर युएईच्या कोणत्याही बॅटरला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.
advertisement
या सामन्यामध्ये टीम इंडिया फक्त एक स्पेशलिस्ट फास्ट बॉलरसह मैदानात उतरली होती. टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या अर्शदीपला संधी देण्यात आली नाही. बुमराहसोबत हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी फास्ट बॉलिंगची जबाबदारी सांभाळली, तर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हे 3 स्पिनर मैदानात उतरले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांचा 3 स्पिनर घेऊन खेळण्याचा या निर्णय योग्य ठरला.
भारताची प्लेयिंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती