काय म्हणाले सय्यद किरमानी ?
'ज्या प्रकारे क्रिकेटचा खेळ खेळला जात आहे, त्यामध्ये कोणताही सभ्यपणा राहिलेला नाही. मैदानावर खूप अशिष्ट आणि अहंकारी हावभाव पाहायला मिळत आहेत. मला सगळीकडून संदेश येत आहेत. भारतीय संघ काय करत आहे? मैदानावर कोणतं राजकारण चालू आहे? हे ऐकून मला लाज वाटत आहे. सध्याच्या क्रिकेटपटूंच्या युगात काय झालंय? आशिया कपमध्ये जे घडले ते घृणास्पद आहे, असं मत सय्यद किरमानी यांनी नोंदवलंय.
advertisement
जे घडले ते योग्य नाही - सय्यद किरमानी
सय्यद किरमानी यांच्या मते, खेळाच्या क्षेत्रात राजकारणाने प्रवेश करू नये. 'ज्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रात, विशेषतः क्रिकेटमध्ये गोष्टी सुरू आहेत, त्या माझ्यासाठी खूप निराशजनक आहेत. जे घडले ते योग्य नाही. राजकारण सामान्यतः खेळात येता कामा नये,' असे त्यांनी ठणकावून सांगितलं.
राजकारण बाजूला ठेव - सय्यद किरमानी
राजकारण बाजूला ठेवा. खेळातून जे काही दूर घडलं आहे, ते तिथंच सोडा. तुम्ही या महान क्रिकेटच्या खेळातून जे काही जिंकत आहात किंवा कमवत आहात, त्याला राजकारणाशी जोडू नका. ते तुम्ही चांगल्या कामांसाठी अर्पण करू नका. कोणतेही चांगलं काम, अगदी समजू शकतो, पण त्याला राजकारणाशी जोडू नका, असंही सय्यद किरमानी म्हणाले.
मला माझी मान खाली घालावी लागतीय - सय्यद किरमानी
आपल्या खेळण्याच्या दिवसातील भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमधील सलोख्याचे संबंध त्यांनी आठवले. किरमानी म्हणाले, 'आमच्या काळात खेळाडूंमध्ये इतका सुंदर सलोखा होता. पाकिस्तानी खेळाडू भारतात येत होते, आम्ही पाकिस्तानमध्ये जात होतो. काय आतिथ्य, काय प्रेम, काय स्नेह... एक क्रिकेटपटू म्हणून मला माझी मान खाली घालावी लागत आहे, असं म्हणत सय्यद किरमानी यांनी टीम इंडियावर टीका केली आहे.