TRENDING:

आशिया कपमध्ये भारताचा डबल धमाका, चीननंतर आता जपानलाही चिरडलं!

Last Updated:

आशिया कप हॉकीमध्ये भारतीय टीमने आपली दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आधी चीनला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भारताने जपानचा 3-2 ने पराभव केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आशिया कप हॉकीमध्ये भारतीय टीमने आपली दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आधी चीनला पराभवाची धूळ चारल्यानंतर आता भारताने जपानचा 3-2 ने पराभव केला आहे, त्यामुळे स्पर्धेत भारतीय टीमने सलग दुसरा विजय मिळवला आहे. या सामन्यात, भारतीय टीमने पहिल्या क्वार्टरपासूनच जपानवर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारताचा स्कोअर 3-1 होता, पण शेवटच्या क्वार्टरमध्ये जपानने पुनरागमन केले आणि दुसरा गोल करून आपला स्कोअर सुधारला, पण ते भारताला जिंकण्यापासून रोखू शकला नाही.
आशिया कपमध्ये भारताचा डबल धमाका, चीननंतर आता जपानलाही चिरडलं!
आशिया कपमध्ये भारताचा डबल धमाका, चीननंतर आता जपानलाही चिरडलं!
advertisement

सामन्याचा पहिला क्वार्टर भारतासाठी उत्कृष्ट होता. भारतीय टीमने आक्रमक सुरुवात केली आणि लगेचच मनदीप सिंग आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या गोलमुळे 2-0 अशी आघाडी घेतली. जपानने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि कवाबे कोसेईच्या गोलने स्कोअर 2-1 केला.

हरमनप्रीतचा पुन्हा एकदा चमत्कार

भारतीय टीमने आपली आघाडी कायम ठेवली आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने चौथ्या क्वार्टरमध्ये आणखी एक शानदार गोल करून भारताचा विजय निश्चित केला. जपानने शेवटच्या क्षणी आणखी एक गोल केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या विजयासह, भारतीय टीमने सुपर-4 मध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. भारताचा पुढचा सामना कझाकिस्तानविरुद्ध असेल.

advertisement

यजमान भारतीय टीम सोमवारी कझाकिस्तानविरुद्ध स्पर्धेतील शेवटचा पूल सामना खेळेल. आशिया कपमधील विजेता पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय होईल.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कपमध्ये भारताचा डबल धमाका, चीननंतर आता जपानलाही चिरडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल