मॅचचा टर्निंग पॉईंट
खरंतर या मॅचचा निकाल पहिला बॉल पडण्याच्या आधीच लागला, असं म्हणावं लागेल. कारण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानी कॅप्टनच्या या निर्णयावरून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं, कारण दुबईच्या या खेळपट्टीवर आव्हानाचा पाठलाग करतानाच जास्त टीम जिंकल्या आहेत.
दुबईमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात 4 टी-20 मॅच झाल्या आहेत. या सर्व सामन्यांमध्ये शेवटी बॅटिंग करणाऱ्या टीमचाच विजय झाला आहे. 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दुबईमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला होता. तर 2022 च्या आशिया कपमध्ये पाकिस्तानने भारताचा 5 विकेटने पराभव केला, यानंतर पुढच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेटने धूळ चारली. आता पुन्हा एकदा भारताने आव्हानाचा पाठलाग करून पाकिस्तानला पराभूत केलं. दुबईच्या या खेळपट्टीवर टॉस जिंकून पहिले बॅटिंग करताना शेवटचा विजय 2018 साली आला, जेव्हा पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं.
advertisement
दुबईमध्ये चेस करणं सोपं
दुबईची ही खेळपट्टी सुरूवातीला संथ असते, त्यामुळे बॉल बॅटवर थांबून येतो आणि बॅटरला शॉट खेळणं कठीण होतं. रात्र झाल्यानंतर दुबईमधील वातावरण थंड होतं, तसंच दवही पडतं, त्यामुळे खेळपट्टी जलद होत जाते आणि बॉल बॅटवर येतो आणि बॅटरला स्कोअर करणंही सोपं होतं. याशिवाय दव पडल्यामुळे बॉलरला बॉल पकडणंही कठीण होतं.
दुबईमधील टॉसचं हे रेकॉर्ड पाहता पाकिस्तानने पहिले बॅटिंगचा निर्णय का घेतला? याबाबत अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.