मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलला टीम इंडियाला विकेट मिळाली. मॅचचा पहिला बॉल वाईड टाकल्यानंतर हार्दिक पांड्याने सॅम अयुबला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पॉईंटच्या दिशेने हवेत शॉट मारल्यानंतर बुमराहने सॅम अयुबचा कॅच पकडला. सॅम अयुब आशिया कपमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यातही सॅम अयुब पहिल्या बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. ओमानच्या शाह फैजलने सॅम अयुबला एलबीडब्ल्यू केलं होतं.
advertisement
6 बॉल 6 सिक्स मारणार
या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर तनवीर अहमद याने सॅम अयुबबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. सॅम अयुब जसप्रीत बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारेल, असं तनवीर अहमद म्हणाला होता, यावरून तनवीर अहमदला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही करण्यात आलं होतं. मैदानात मात्र सॅम अयुब दोन्ही सामन्यांमध्ये एकही रन न करता आऊट झाला.
सॅम अयुबने 2024 साली पाकिस्तानकडून पदार्पण केलं, यानंतर त्याला 41 पैकी 39 सामन्यांमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. यात त्याने 22.10 ची सरासरी आणि 136.4 च्या स्ट्राईक रेटने 816 रन केल्या आहेत. नाबाद 98 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. तसंच त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतकं केली आहेत.