चीनमधील हांगझोऊ इथं सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने रविवारी एकूण 15 पदके जिंकून भारताने इतिहास रचला आहे. नेमबाजीपासून ते अॅथलेटिक्सपर्यंत सर्वच क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. आतापर्यंत 13 सुवर्णांसह एकूण 53 पदकं जिंकली आहेत.
भारताने ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेचा रेकॉर्ड मोडला आहे. 2010 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने एका दिवसात सर्वाधिक पदकं जिंकली होती. तेव्हा भारताला 14 व्या दिवशी 11 पदकं मिळाली, तर 2014 इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एकाच दिवसातील सर्वोत्तम कामगिरी 8 व्या दिवशी होती. तेव्हा भारतीय खेळाडूंनी एका दिवसात 10 पदके जिंकली होती. 2018 जकार्ता आशियाई खेळांमध्ये, भारताने 10 व्या दिवशी एकूण 9 पदके जिंकली, तर 2010 ग्वांगझू आशियाई खेळांमध्ये भारताने 9 व्या दिवशी 9 पदके जिंकली.
advertisement
कोणत्या इव्हेंटमध्ये कोणत्या खेळाडूंनी पदकं जिंकली?
अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण तर तेजिंदरपाल सिंग तूरने शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले.
नेमबाज पृथ्वीराज तोडेमान, कैनान चेनई, जोरावर सिंग संधू यांनी पुरुषांच्या ट्रॅप संघात सुवर्णपदक जिंकलं
गोल्फपटू अदिती अशोकने महिलांच्या गोल्फमध्ये रौप्यपदक जिंकलं.
महिला ट्रॅप संघात मनीषा कीर, प्रीती रझाक आणि राजेश्वरी कुमारी यांनी रौप्य मिळवलं.
महिलांच्या 1500 मीटर स्पर्धेत हरमिलन बैंस यांनी रौप्यपदक पटकावलं.
अजय कुमार सरोजला पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत रौप्यपदक.
मुरली श्रीशंकरला लांब उडीत रौप्यपदक
ज्योती याराजीला महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक
लक्ष्य सेन, एस रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, किदांबी श्रीकांत, कपिला ध्रुव, केपी मिथुन, केपी मिथुन, पी. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं.
निखत जरीनने महिला बॉक्सिंगमध्ये (50 किलो) कांस्य,
नंदिनी आगसराने महिलांच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत कांस्य
सीमा पुनियाने डिस्कस थ्रो स्पर्धेत कांस्यपदक
जिन्सन जॉन्सनने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत कांस्यपदक
कीनन चेनईने पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं.
World Cup : ना विराट ना बुमराह, पाकिस्तानच्या उपकर्णधाराने सांगितले भारताचे दोन धोकादायक खेळाडू
आशियाई खेळांच्या गुणतालिकेत भारत 13 सुवर्ण, 21 रौप्य आणि 19 कांस्य पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. यजमान चीन 131 सुवर्ण, 72 रौप्य आणि 39 कांस्यांसह पहिल्या स्थानावर आहे, तर कोरिया 30 सुवर्णांसह एकूण 125 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर जपान 29 सुवर्णांसह 112 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.