300 चा टप्पा हुकला
हर्षित राणाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. कुलदीप, अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने एकत्रितपणे 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात मिळून देखील 300 चा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक 56 रन केले, तर कर्णधार मिचेल मार्शने 41 रनचे योगदान दिले. मात्र, मधल्या ओव्हर्समध्ये भारताच्या बॉलर्सनी नियमित अंतराने विकेट घेत ऑस्ट्रेलियाला मोठी पार्टनरशिप करू दिली नाही. कूपर कॉनॉलीने 23 रनची खेळी करत थोडा हल्लाबोल केला.
advertisement
मॅच कुठं फिरली?
श्रेयस अय्यर याने अॅलेक्स कॅरी याचा कॅच घेतल्यानंतर मॅच फिरली. टीम इंडियाच्या स्पिनर्सने त्यानंतर हात आखडता घेतला नाही. वॉशिंग्टन सुंदर याने रेनशॉ याला आऊट केल्यावर कॉनली आणि इतर गँग झटपट आऊट झाली. ऑस्ट्रेलियाने सात बॅटर्स मैदानात उतरवले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोर उभारता आला नाही.
विराट कोहलीवर सर्वांचं लक्ष
दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट घेतल्या, तर कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विराट कोहली याचा ऑस्ट्रेलियामध्ये अखेराचा सामना असू शकतो. त्यामुळे त्याच्यावर लक्ष लागलं आहे.
टीम इंडिया (Playing XI) : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (Playing XI) : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
