रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोघंही त्यांचा शेवटचा सामना खेळले, मॅच संपल्यानंतरही विराट आणि रोहितने हा आपला ऑस्ट्रेलियामधला शेवटचा सामना असेल, असेच संकेत दिले. रोहित आणि विराटची बॅटिंग बघत असताना ऑस्ट्रेलियाचा कॉमेंटेटर भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. विराट आणि रोहित यांना ऑस्ट्रेलियामध्ये शेवटचं बॅटिंग करताना पाहून कॉमेंटेटरला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी नाबाद 168 रनची पार्टनरशीप केली. रोहितने नाबाद 121 रनची आणि विराटने नाबाद 74 रनची खेळी केली. या भावनिक क्षणाने फक्त प्रेक्षकच नाही तर कॉमेंटेटरही भारावले. सोशल मीडियावर सेन क्रिकेट नावाच्या पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटरच्या डोळ्यात रोहित-विराटला पाहून अश्रू दिसत आहेत. रोहित-विराटची ऑस्ट्रेलियामधील ही शेवटची वनडे असू शकते, हे सांगताना कॉमेंटेटर भावुक झाला.
रोहित-विराट पुन्हा कधी दिसणार?
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर आता रोहित आणि विराट महिन्याभरानंतर मैदानात उतरणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला 30 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 30 नोव्हेंबर 2025- रांची
दुसरी वनडे- 3 डिसेंबर 2025- नागपूर
तिसरी वनडे- 6 डिसेंबर 2025- विशाखापट्टणम
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी रांचीचा सामना खास ठरू शकतो, कारण बऱ्याच काळानंतर हे दोघेही भारतामध्ये टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर भारत घरच्याच मैदानात न्यूझीलंडविरुद्धही 3 वनडे मॅचची सीरिज खेळेल, तेव्हाही विराट-रोहितला पाहण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे.
